सुविधा उपलब्ध करण्याचा साई पुष्पचा लौकिक – पो.नि. पुजारी

शेवगावात डायलेलिस युनिटचे उद्घाटन

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : शेवगावात रुग्णांची गरज ओळखून अत्यावश्यक आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याचा साई पुष्प हॉस्पिटलचा लौकिक असून कोव्हिड  काळात  येथे रुग्णांना मिळालेली  सेवा वाखाणव्यासारखी असल्याचे प्रतिपादन  शेवगावचे पोलिस निरीक्षक  विलास पुजारी यांनी येथे केले.

साई पुष्प हॉस्पिटलमध्ये प्रसिध्द किडणी तज्ञ ( नेफ्रॉ लॉजीस्ट ) डॉ . साई प्रसाद यांचे प्रमुख उपस्थितीत  उभारण्यात आलेल्या डायलेसीस युनिटचे उद्घाटन पोलिस निरीक्षक पुजारी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. स्वरूप पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे रासपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र घनवट, केदारेश्वरचे संचालक श्रीकांत पिसाळ, डायलेसिस युनिटचे तंत्रज्ञ सुजित तुरकणे यांचेसह पत्रकार उपस्थित होते.

       आतापर्यंत शेवगावात डायलेसीसची सोय नव्हती, रुग्णांना त्यासाठी अन्यत्र जावे लागे. साई पुष्प हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत प्रधान मंत्री योजनाची सुविधा उपलब्ध असल्याने पिवळे रेशनकार्ड व आधार कार्डवर मोफत डायजेसीस करता येणार आहे.