शेवगाव पंचायतसमिती कार्यालयासमोर अशा स्वयंसेविकांना केला जोरदार निषेध

शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ : तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने शुक्रवारी (दि.१२) शेवगाव पंचायतसमिती कार्यालयासमोर एकत्र येत, विविध मागण्यासंदर्भात जोरदार निदर्शने करण्यात येऊन त्यासाठी संघटनेने पुकारलेल्या राज्य व्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांना काल अटक केल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणा बाजी करुन निषेध व्यक्त करण्यात आला.

मागील वर्षी १८ ऑगस्ट ते १ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या संपा वेळी मुंबई येथे आरोग्य मंत्र्यांनी बैठक घेऊन आशा व गटप्रवर्तकांना दिवाळी पूर्वी दोन हजार रुपये भेट देण्याचे, स्वयंसेविकांना सात तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ, तसेच ऑनलाइन कामाची शक्ती करणार नाही, आदी मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. परंतु शासनाने मान्य केलेल्या मागण्यांसंदर्भात शासन निर्णय काढला नाही.

त्यामुळे राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली वाढ गेल्या सात वर्षांपासून मिळाली नसल्याने या संदर्भात नासिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासंदर्भात, निवेदन देण्यासाठी गेलेले राज्य अध्यक्ष राजू देसले यांना अटक करण्यात आली. या घटनेचा संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी आशा व गटप्रवर्तक संघटनेचे नेते काॅ. नांगरे, सुनेत्रा महाजन, वैशाली भूतकर, सुवर्णा देशमुख, आशा मगर, शमा सय्यद, गीता खोसे, वैशाली वाघुले, सुवर्णा साळुंखे, मंगल कोल्हे, लता ठोंबळ, सुनीता सोनटक्के, संगीता जगदने, शितल थोरवे, तारा अव्हाड, कविता दुधाळ, अलका कोरडे, सुनिता देवढे, यांच्यासह अशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते.