भावीनिमगाव येथील जगदंबा मातेचा शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : तालुक्यातील भावीनिमगाव येथील जगदंबा मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला असून गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठलनाथ महाराज, वैकुंठवासी कृष्णदेव महाराज काळे यांच्या कृपाशीर्वादाने बाल संन्याशी ह.भ.प. अशोक महाराज बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

      या नवरात्र उत्सवकाळत अखंड हरिनाम सप्ताह, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ व विनोदाचार्य उद्धव महाराज सबलस, प्रकाशगिरी महाराज देवगड, रामगिरी महाराज येळी, आदिनाथ महाराज लाड देवाची आळंदी, लक्ष्मण महाराज भावर कळसपिंपरी, पारस महाराज जैन जळगाव, विष्णू महाराज मिरझे देवाची आळंदी, दिनकर महाराज अंचवले यांचे सकाळी काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर भाविक मिलिंद नाना कुलकर्णी यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली  आहे. या देवस्थानात खडी नवरात्र धरण्याची प्रथा आहे.