आमदार काळेंच्या विनंतीवरून उपोषणकर्त्यांचा आत्मदहन करण्याचा निर्णय मागे

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. १४ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोपरगाव येथे मराठा समाज बांधवांचे आमरण उपोषण सुरु असून उपोषणकर्त्यांकडून आत्मदहनाचा ईशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर करून त्यांनी उपोषणकर्त्यांना आत्मदहन न करण्याची केलेली विनंती उपोषण करणाऱ्या मराठा समाज बांधवांनी मान्य करून आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी अॅड. योगेश खालकर, अनिल गायकवाड, विनय भगत या मराठा समाज बांधवानी आमरण उपोषण सुरु केले असून त्यांच्या समवेत मराठा समाज बांधव देखील साखळी पद्धतीने उपोषण करीत आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्यास शनिवार (दि.१६) रोजी आत्मदहन करण्याचा ईशारा उपोषणकर्ते अॅड. योगेश खालकर, अनिल गायकवाड, विनय भगत यांनी प्रशासनाला दिला होता. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला.मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घ्यावी याबाबत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची भेट घेवून आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.

महायुती शासन मराठा समाजाच्या आंदोलनाची गांभिर्याने दखल घेवून त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल. त्यामुळे  उपोषणकर्त्यांनी शनिवार रोजी आत्मदहन करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली. हि विनंती मान्य करून  उपोषणकर्त्यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती काहीशी खालावली असून डॉक्टरांनी उपोषणकर्त्यांच्या तब्बेतीची योग्य काळजी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब  कोळेकर, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार संदीपकुमार भोसले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर, जेलर चंद्रशेखर कुलथे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, पद्मकांत कुदळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. राहुल रोहमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव, फकिर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, मुकुंद इंगळे,

शैलेश साबळे, सचिन गवारे, मनोज नरोडे, प्रशांत वाबळे, चंद्रशेखर म्हस्के, किशोर डोखे, उत्तमराव औताडे, बाबुराव खालकर, लक्ष्मण सताळे, नारायण लांडगे, अंबादास वडांगळे, अॅड. मनोज कडू, नंदकुमार डांगे, आबा आभाळे, राजेंद्र आभाळे, अक्षय आंग्रे, प्रदीप कुऱ्हाडे, सोमेश शिंदे, जनार्दन शिंदे, अमोल आढाव, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, डॉ. तुषार गलांडे, जावेद शेख, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, सुनील बोरा, आकाश डागा, एकनाथ गंगूले, 

शुभम लासुरे, महेश उदावंत, इम्तियाज अत्तार, विलास बेंद्रे, संतोष शेलार, योगेश वाणी, विशाल निकम, संतोष शेजवळ, आकाश गायकवाड, राकेश शहा, मंदार हिंगे, हर्षल जैस्वाल, शंकर घोडेराव, विजय नागरे, राजेंद्र देवरे, राजेंद्र उशिरे, शाहरुख कुरेशी, मंगेश नाईकवाडे, भरत बोरनारे, हारुण शेख, अनिरुद्ध काळे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.