कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : 2024 रोजी School Games Federation of India यांच्या वतीने त्यागराज स्टेडियम नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धा 2023/24 चे आयोजन करण्यात आलेले होते. संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्यांच्या संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.
मध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील मल्ल पै. प्रविण गोरख संगमनेरे योन 19 वर्षे वयोगटातील 55 किलो वजनी गटांमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करत प्रेक्षणीय खेळाचे प्रदर्शन करत अतिषय उत्कृष्ट अशी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. आणि अभिमानास्पद बाब म्हणजे अशी की, या संपूर्ण स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाला एकमेव सुवर्णपदक हे प्रविणच्या माध्यमातून मिळालेले आहे.
प्रविण ने पहिल्या फेरीमध्ये पंजाबच्या मल्लाला पराभूत केले. दुसया फेरीमध्ये छत्तीसगडच्या मल्लास पराभूत केले. उपांत्य फेरीत दिल्लीच्या मल्लास पराभूत करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले व अंतिम फेरीत अटीतटीच्या सामन्यात हरीयाणाच्या मल्लाचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
प्रविण हा प.पू.सद्गुरु आत्मा मालिक माउलींच्या कृपाछत्र छायेखाली गुरुवर्य वस्ताद भरत नायकल सर यांच्या मार्गदर्षनाखाली आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे दैनंदिन सातत्याने कुस्तीचा कसून सराव करत आहे.
प्रविणला विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष मा.नंदकुमार सुर्यवंशी, आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS, राष्ट्रीय कुस्ती कोच भरत नायकल, आंतरराष्ट्रीय कोच, रामफल ठकरान, NIS Qualified कोच पै. विवेक नायकल, कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक पै.राजू पाटील, पै.अक्षय डांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.