शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातील एसएससी परीक्षा केंद्र बोधेगाव अंतर्गत उपकेंद्र भगवान बाबा विद्यालय बालमटाकळी येथे भूगोलच्या पेपरच्या वेळी गावातील टारगट मुलांनी अनाधिकारांने प्रवेश करून महिला पर्यवेक्षकांना आर्वाच्य भाषा वापरली त्याचा शेवगाव तालुक्यातील शिक्षक भारती संघटना, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक परिषद, टी डी एफ या सर्व संघटनांनी निषेध केला असून शेवगावचे तहसीलदार यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
असे प्रकार भविष्यात झाल्यास सर्व शिक्षक संघटना शासकीय कामकाजावर बहिष्कार घालतील असा निर्वाणीचा इशारा शिक्षक भारती संघटना शेवगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक परिषद, शेवगाव तालुका पीडीएफ संघटना यांनी दिला.
यावेळी दिलेल्या निवेदनावर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, जिल्हा कार्यवाहक शिक्षक भारती संघटना संजय भुसारी, शिक्षक भारती तालुकाध्यक्ष कैलास जाधव, तालुकाध्यक्ष माध्यमिक संघ अरंविद देशमुख, टी डी पी शेवगाव अध्यक्ष राजेंद्र पानगव्हाणे, माधवराव काटे, शिक्षक भारतीचे शेवगाव तालुका उपाध्यक्षअशोक उगलमुगले उपाध्यक्ष शिक्षक भारती ए आर राजळे,
प्रा नितीन मालानी, समाधान आराख, आर बी शिंपी शिक्षक भारती, डी पी रणसिंग, आप्पासाहेब उभेदल,आत्माराम दहिफळे संजय मरकड, बी आर टाकळकर, बाबासाहेब उगलमुगले संभाजी टाकळकर, अशोक आगवणे
दीपक झाडे ,निवृत्ती झाडे मोहनराव उंडे, ए एन वाणी, गोरक्ष जाधव जालिंदर शेळके मधुकर पावशे, बाबासाहेब मोहिटे, आण्णसाहेब माळी, संभाजी टाकळकर, बाळासाहेब कोकरे आदिच्या सहया आहेत.