व्यक्तीची सध्याची प्रगती दिसते, पण त्यामागचा त्याग कोणालाही दिसत नाही – मंदाकिनी खंडागळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : जीवनात संकट आल्यानंतर त्यावर मात करून यश प्राप्त करावे. जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्याचा मोठेपणा कळत नाही. सध्याची प्रगती दिसते पण पूर्वीचा त्याग कोणालाही दिसत नाही. असे प्रतिपादन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका मंदाकिनी खंडागळे यांनी केले.

  चापडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी  स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांची ३७ वी पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. यावेळी  त्या अध्यक्ष स्थानाहून  बोलत होत्या.  व्यासपीठावर प्राचार्य अरुण वावरे, उपमुख्याध्यापक भाऊसाहेब टाकळकर, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, श्रीमती सुनीता वराडे , शितल दहिवाळकर उपस्थित होते. 

खंडागळे पुढे म्हणाल्या की, स्वर्गीय निर्मलाताईंनी  शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवली. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य महान होते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली. त्यांच्या कार्याचा वारसा समाजातील सर्व घटकांनी पुढे चालू ठेवावा.

   शितल दहिवाळकर म्हणाल्या, स्व. निर्मलाताई या शिस्तप्रिय व प्रेमळ होत्या. कर्मयोगी आबासाहेबांना पावलोपावली त्यांनी साथ दिली. आज त्यांच्याच कार्याचा वारसा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ॲड. डॉ. विद्याधर काकडे व हर्षदाताई काकडे मोठ्या जोमाने पुढे चालवत आहेत.  प्रा .दादासाहेब ज्योतिक यांनी सुत्रसंचलन केले तर प्राचार्य अरुण वावरे यांनी आभार मानले.