कर्मकांड टाळत विधायक कार्यास देणगी, चांदगुडे कुटुंबाचा आदर्श 

Mypage

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. १३ :  तालुक्यातील चास(नळी) येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी मातोश्रींच्या निधनानंतर त्यांचे देहदान करण्यात आले. या निमित्ताने चास (नळी) येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने कर्मकांड टाळून विवीध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबिर तसेच अवयवदान यावर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

Mypage

             यावेळी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई चे उपाध्यक्ष मा.सुनील देशपांडे यांनी देहदान व अवयवदान या विषयावर  प्रबोधन केले .ते म्हणाले की, मेंदूमृत अवस्थेत एक रुग्ण आठ व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो. अशा व्यक्तींना सुमारे ६० ते ७० अवयव दान करू शकतो त्यामुळे अवयवदान ही काळाची गरज आहे.

Mypage

    सुगंधाबाई चांदगुडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर चांदगुडे यांनी त्यांचा वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान केला. त्यानंतरचे कर्मकांड टाळून मारूतीराव दगडू तिडके विद्यालय, केशवराव चांदगुडे प्राथमिक शाळा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती,लायन्स मूक बधीर विद्यालय, वात्सल्य वृद्दाश्रम यांना अर्थिक मदत करण्यात आली. तेरा व्यक्तींनी मरणोत्तर देहदानाचे संकल्प केले.

Mypage

याप्रसंगी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. अवयवदान व देहदान यावरील पुस्तकांचे वाटप  करण्यात आले. ग्रामीण भागात प्रथमच असा कार्यक्रम झाल्याने लोकांमध्ये कुतुहल होते. प्रबोधनाने अनेकांच्या मनातील गैरसमज दुर झाले. उपस्थितांपैकी अनेकांना अंधश्रद्धा झुगारून विज्ञानवादी बनण्याचे आवाहान  केले. या प्रसंगी तालुक्यातील अनेक केवळ वाचक वृत्तपत्रातील बातमी वाचून आले होते.

Mypage

चांदगुडे कुटुंबियांनी विधायक कार्यास आर्थिक मदत तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे, याचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त गावकरी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक जयश्री शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन किरण चांदगुडे यांनी केले, तर आभार ॲड. समीर शिंदे यांनी केले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *