श्रमिक मजदूर संघटनेच्या निमंत्रकपदी पानपाटील, देशमुख यांची निवड

Mypage

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : भारतात सर्वात कमी मानधनावर काम करणाऱ्या एमडीएम स्वयंपाकी व मदतनीस यांची संघटना श्रमिक मजदूर संघाच्या कोपरगाव तालुका निमंत्रक पदी प्रकाश पानपाटील, ज्योती जावळे, दिपाली भागवत तर कोपरगाव शहर निमंत्रक पदी संदीप देशमुख व विद्या अभंग यांची नेमणूक संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सविता विधाते यांनी केली आहे.

Mypage

कोपरगाव येथील साईबाबा तपोभूमी मंदिर येथे तालुक्यातील शालेय पोषण आहार योजनेत काम करणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांची बैठक अहमदनगर जिल्हाध्यक्ष सविता विधाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध समस्या सोडवण्यासह अडचणीवर उपाय कसा शोधता येईल व भविष्यात संघटनेच्या वतीने शासन दरबारी आपले प्रश्न मांडून कसे सोडवण्यात येईल यावर चर्चा करण्यात आली.

Mypage

संघटनेच्या वतीने जिल्हाभर फिरून, संघटन करून न्याय मिळवला जाईल असे सविता विधाते यांनी सांगितले. संघटनेच्या कामावर सर्वांनी विश्वास ठेवून आपले प्रश्न सोडवू असे प्रकाश पानपाटील यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील सर्व भागातून स्वयंपाकी व मदतनीस मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप देशमुख यांनी केले तर आभार  विद्या अभंग यांनी मानले. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *