शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : कुटूंबासाठी व मुलांसाठी झटणाऱ्या वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करणे ही भारतीय संस्कृती आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार राम शिंदे यांनी केले. तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक येथे आयोजित बलभीम कोळगे व अवंतिका कोळगे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात ते बोलत होते.
खासदार डॉ. सुजय विखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार मोनिकाताई राजळे, सोमेश्वर महाराज गवळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,सुवेंद्र गांधी,जेष्ठ नेते दिलीपराव लांडे,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे,सरपंच संगिता कोळगे,बाळासाहेब सोनवणे,बबन भुसारी,अंबादास कळमकर,कचरू चोथे,उमेश भालसिंग, बापुसाहेब पाटेकर, बापुसाहेब भोसले,सुभाष भागवत,सागर फडके,अमोल सागडे,बाळासाहेब आव्हाड, सोमनाथ कळमकर,तुषार पुरनाळे , संदिप वाणी, अनिल खैरे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी खा.विखे म्हणाले, जुन्या पिढीतील जाणत्या व्यक्तींमुळे कुटुंब, गाव व समाजात एकोपा टिकून आहे. हे त्या पिढीचे मोठे योगदान आहे. कोळगे यांच्यामुळे भाजपमधील चार गट एकत्र आले ही जनसंघाच्या विचारांची खरी ताकद आहे.
आ.राजळे म्हणाल्या, एकत्रित कुटुंबपध्दतीमुळे ग्रामीण भागातील मुलांवर चांगले संस्कार होतात. मात्र हा कौटुंबिक संस्काराचा ठेवा शहरी संस्कृती व छोट्या चौकोनी कुटुंबामुळे लोपत चालला आहे. बाळासाहेब कोळगे यांनी प्रास्ताविक केले. आबासाहेब कोळगे यांनी आभार मानले.