राज्यस्तरीय गोळा फेकीत ढाकणे पॉलिटेक्निकचा शुभम बडे प्रथम

शेवगाव प्रतिनिधी, दि.३: राक्षी  येथील कै.सौ.सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तृतीय वर्ष मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी शुभम बडे ह्याने इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेत ९.८१ मीटर थ्रोसह प्रथम आला आहे.

      यानिमित्ताने त्याचा संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांचे अध्यक्षतेखाली विशेष कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे यांचे हसो सत्कार  करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ .आर. एच . अत्तार  म्हणाले , यापूर्वी श्रीगोंदा येथे झालेल्या विभागीय विभागीय स्पर्धेत देखील गोळा फेक मध्ये बडे प्रथम आला होता.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत असलेल्या ढाकणे पॉलिटेक्निकमध्ये दैनंदिन पाठयक्रम बरोबरच विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना खेळासाठी भव्य क्रिडांगण उपलब्ध असून यावर फुटबॉल, क्रिकेट, हॉलिबॉल, कबड्डी, खो खो, अथेलेटिक असे विविध खेळाच्या सुविधा उपलब्ध आहेत. कॉलेजचे क्रिडा समन्वयक प्रा. विश्वास घुटे तसेच सह समन्वयक मयूर पुरनाळे यांचे बडे यास मार्गदर्शन लाभले.

यापूर्वीही संस्थेचे  अनेक विद्यार्थी पोलीस भरती, सैन्य भरती, शासकीय सेवा, विविध नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वी झाले आहेत. अनेकविध सोयी-सुविधांनी संस्थेने अल्पावधीतच जनमानसात मानाचे स्थान पटकाविले आहे. याचीच दखल घेत संस्थेस तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.    

यावेळी संस्थेच्या सचिव जया राहाणे, विश्वस्त ऋषिकेश ढाकणे, संगणक विभाग प्रमुख प्रा. महेश मरकड, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. सचिन म्हस्के, स्थापत्य विभागप्रमुख प्रा. इर्शाद पठाण, प्रा. औताडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.