जागतिक दिव्यांग दिन सप्ताहास तालुक्यात उत्साहात प्रारंभ

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : जागतिक दिव्यांग दिननिमित्ताने ‘समान संधी जनजागृती ‘ सप्ताहास आज ‘ तालुक्यात ठिकठिकाणच्या शाळमध्ये प्रारंभ झाला. दि.०३ ते १० डिसेंबर अखेर सप्ताहभर समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण, शिक्षण विभाग, पंचायत समिती  अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात  येणार आहेत.

       या निमित्ताने तालुक्यातील  सर्व माध्यमाच्या शाळामध्ये आज दिव्यांग दिन ‘समान संधी जनजागृती ‘ सप्ताहाची मोठ्या उत्साहात सुरवात झाली. यावेळी दिव्यांगत्वाबाबत सामाजामध्ये जनजागृती व्हावी म्हणून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

तसेच समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण, गटसाधन  कार्यालयात चंद्रकला चव्हाण (सावली दिव्यांग संघटना पदाधिकारी), महेबूब शेख (प्राथ. शिक्षक),  श्रीकांत देवढे (प्राथ. शिक्षक), सलीम शेख  या दिव्यांगांचा  सन्मान करण्यात आला.  दिव्यांग विद्यार्थी अश्विन घरवाढवे याचा शैक्षणिक साहित्य देऊन  गटसमन्वयक शैलजा राऊळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

     सकाळी पंचायत समितीच्या मारुतराव घुले पाटील सभागृहात नेवासेचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश पाटेकर, कल्याण मुटकुळे, बापू चव्हाण यांचे उपस्थितीत दिव्यांगासाठी योग शिक्षणाचे आयोजन करण्यात आले.   शहरातील जि.प.  प्राथमिक शाळा ,समर्थ विद्यालय ,आदर्श विद्यालय ,बाळासाहेब भारदे विद्यालय, निर्मल ब्राईट विद्यालय आदि ठिकाणी याबाबत आज प्रबोधन करण्यात येऊन खाऊवाटप करण्यात आला.

       यावेळी  गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, मोहिनीराज साळवे, विजया खाटिक, भारती औताडे, महेश राऊत, अनिल जाधव, काकासाहेब गर्जे, दशरथ गायकवाड, बाळासाहेब पालवे, दत्तात्रय सुरवसे, पांडुरंग खरड, अशोक तोरडमल, अनंत शिनगारे, देविदास खडके, संतोष ढाकणे, डॉ.शंकर गाडेकर, मधुकर घुले सर्व विषयतज्ञ, विशेष शिक्षक, शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्र्यंबक फपाळ यांनी केले. तर  नितीन मिसाळ यांनी आभार मानले.