के. बी रोहमारे महाविद्यालयाला जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत यश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : येथील के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के. बी.  रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयास  दिनांक २८ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलत संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत उपविजेतेवर मिळविलेले आहे.

या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील मुलांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून हे यश संपादन केले. 

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष मा.  अशोकराव रोहमारे, संस्थेचे सचिव विधिज्ञ संजीव कुलकर्णी,  विश्वस्त संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी. एस.  यादव,  महाविद्यालयाचे रजिस्ट्रार  डॉ.  अभिजीत नाईकवाडे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. बी.आर. सोनवणे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. विभागाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.  सुनील कुटे सर व क्रीडा शिक्षक श्री. मिलिंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले.