मुख्यमंत्री शिंदेना लाभला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा – औताडे 

शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने चांगली कामगिरी केली असून सात खासदार निवडून आले आहेत. शिवसैनिकांना बळ देत असतानाच महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक विकासाभिमुख कामे केलेली आहेत. शिवसेना पक्ष बळकटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले. कोपरगाव मध्ये शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षाचा 58 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न करण्यात आला.

कोपरगाव नगरपालिका शाळा क्र. ९ येथे शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी  शिवाजी जाधव, मनिल नरोडे, रावसाहेब थोरात, अभिषेक आव्हाड, अक्षय जाधव, मनोज राठोड, सनी गायकवाड, मीनाक्षी वाकचौरे, भारत कुऱ्हाडे, हेमा तवरेज, मधुकर टेके, राजेंद्र वाळुंज, घनश्याम वारकर अदी उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 ला शिवसेना पक्षाची स्थापना करून 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याप्रमाणे महाराष्ट्रात काम केले हाच वारसा पुढे समोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत असल्याचेही नितीनराव औताडे यांनी सांगितले.