शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : तालुक्यातील बहुतेक मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली तर काही कामे जोरात सुरू आहेत, मानवी शरीरातील धमन्याप्रमाणे रस्त्याचे कार्य असते. रस्ते चांगले असतील तर दळणवळण वाढते. विकास कार्य होऊ शकते. गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची मोठी दूर्दशा झाली. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व प्रमुख रस्ते आपण पूर्ण करत असल्याची ग्वाही आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.
शेवगावातील बस स्थानक ते भगूर या २ कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.
आ. राजळे म्हणाल्या, जनसामान्यासाठी कार्यरत राहणे हेच आपले कर्तव्य असल्याची आपली निष्ठा असून विकास कार्यात राजकारणाला आपण कधीही थारा देत नाही.
श्री संत गाडगे बाबा चौकात या रस्त्याच्या कामाचा शुभारभ करण्यात आला. या रस्त्याबरोबरच तालुक्यातील सुरू असलेल्या सर्वच रस्त्याची कामे महिनाभरात पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आ. राजळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला आघाडी अध्यक्ष आशा गरड, बापू पाटेकर, उषाताई कंगणकर, रोहिणीताई फलके, माजी नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, महेश फलके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक, ठेकेदार पागिरे, नितीन मालानी, मच्छिंद्र बर्वे, संभाजी जायभाय, केशव आंधळे, पांडुरंग तहकीक, कैलास सोनवणे, जगन्नाथ भागवत, कासमभाई शेख, अशोकराव खिळे, जलील राजे, रासपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र घनवट, तुषार पुरनाळे, राजाभाऊ लड्डा, संदीप खरड, महादेव पवार, बाळासाहेब झिरपे, अमोल माने, मुरलीधर लोखंडे, बाबासाहेब धस, मुसाभाई शेख, डॉ. मल्हारी लवांडे उपस्थित होते.