ग्रामीण भागात “माणुसकीची भिंत” स्तुत्य उपक्रम – नामदेव ठोंबळ

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेतून शहरी भागात मोठ्या प्रमाणात माणुसकीची भिंत हे उपक्रम राबविले जातात. त्यातून अनेक गरजवंताना मदत होते. मात्र, हिच संकल्पना जेव्हा राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्टच्या माध्यामतून वारी सारख्या ग्रामीण भागात राबविली जाते हे निश्चितच स्तुत्यप्रत आहे. हा आजवरचा ग्रामीण भागातील पहिलाच प्रयोग असावा असे गौरोद्गर कोपरगावचे  सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काढले.      

      कोपरगाव तालुक्यातील वारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात तसेच राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित “मोफत मदत सेवा केंद्राच्या” प्रांगणात शनिवारी (दि.३) दिव्यांग दिनानिमित्त ५० पेक्षाजास्त दिव्यांग बांधवांचा दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या स्मरणार्थ भेटवस्तू देऊन सन्मान केला. तसेच “माणुसकीची भिंत” या उपक्रमाची फीत कापून सुरुवात करण्यात आली. यावेळी अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

     यावेळी हेलन केलर व राहुल दादा टेके यांच्या प्रतिमेस पुष्पहार, दिपप्रज्वलन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सतीश कानडे होते. यावेळी वारीतील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

     यावेळी व्यासपीठावर सहकार अधिकारी राजेंद्र रहाणे, कोपरगाव बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर टेके, अशोक कानडे, गोदावरी बायोरिफायनरीचे अधिकारी अरुण मुजमुले, एम. के. टेके, पोपट गोर्डे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर टेके, ताराचंद पलघडमल, मदनलाल काबरा, लोकमतचे उपसंपादक रोहित टेके उपस्थित होते. दरम्यान ‘ माणुसकीची भिंत” या उपक्रमास वारीकरांनी पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद दिला.

     ठोंबळ म्हणाले, दिव्यांग बांधवाच्या व्यथा वेगवेगळ्या असतात. त्यांना समाजात जगताना कधीकधी कमी पनाची जाणीव होते. मात्र, भगवंताने त्यांना एक गुण ज्यादा दिलेला असतो. त्यामुळे त्यांनी आपल्या दिव्यगत्वाचा संकोच न बाळगता आपल्यातील सकारात्मक गुणांना चालना देणे गरजेचे आहे. यावेळी सहकार अधिकारी राजेंद्र रहाणे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले. मधुकर टेके, सुरेश जाधव, पोपट गोर्डे, ताराचंद पलघडमल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

    यावेळी भाऊसाहेब टेके, रावसाहेब जगताप, गोरख टेके, रवींद्र टेके, प्रताप टेके, सुधाकर ठोंबरे, भीमराव आहेर, अशोक टेके, अशोक मलिक, चंद्रकांत पाटील, अनंत टेके, बाळासाहेब वरकड, रावसाहेब वाघ, सतीश गायकवाड, विलास जगधने, मनोज जगधने, राजेंद्र गव्हाणे, संजय कवाडे, साईराज टेके, अनुराग टेके, अनिरुद्ध जाधव, अभय टेके यांच्यासह ग्रामस्थ, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे यांनी केले. तर सूत्रसंचालन शंकर महाराज गोंडे यानी तर आभार गोरख टेके यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् गाऊन झाली.