श्रीगणेशच्या १३ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्रीगणेश शिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. यातील एकूण १३ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

  यामध्ये १४ वर्षे वयोगटात १०० मिटर धावणे प्रकारात अस्मिता प्रवीण चांगले, तर साखळी प्रकारात स्तवन साळवे, अमर दिघे, ईश्वर डांगे यांचा द्वितीय क्रमांक आला. सतरा वर्षे वयोगटात १०० मिटर धावणे प्रकारात आदिती डांगे, २०० मिटर प्रकारात प्रणव चौधरी तसेच उंच उडी प्रकारात जय चव्हाण यांचा द्वितीय क्रमांक आला.

१९ वर्षे वयोगटात ८०० मिटर धावणे प्रकारात हेमराज भुसारे, उंच उडी प्रकारात ऋतुजा काळे तर साखळी धावणे गटात पल्लवी दिघे, वैष्णवी तेलोरे , ऋतुजा काळे व श्रेयल शिंदे यांचा द्वितीय क्रमांक आला. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय जनार्दन शेटे यांनी दिली.

    सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा,योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख, रामनाथ पाचोरे, पंकज खंडांगळे, निलेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.बापू पुणेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक दिलीप दुशिंग व रवींद्र मोगल यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.