दुस-यांसाठी केलेल्या सत्कार्यात समाजकार्यची शिकवण – सुमित कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ :  सहकारमहर्षी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्यांने दुस-यांसाठी सत्कार्य करत रहा त्यातच समाजकार्य असल्याची शिकवण दिली. तोच वसा संजीवनी उद्योग समुह तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुट पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले. रोटरी क्लबनेही जगात समाजकार्यातुन अनेकांच्या जीवनांत आनंद निर्माण केला आहे. 

तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील उसतोडणी कामगारांच्या जनजागृतीसाठी कारखाना तसेच रोटरी क्लब कोपरगाव, स्नेहालय अहमदनगर उडान प्रकल्प अंतर्गत बालविवाह प्रतिबंधक, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान रविवारी पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेष गाडे होते. याप्रसंगी थेट अहमदनगर येथुन सायकल यात्रेने बालविवाह जागृती संदर्भात सामाजिक संदेश देणा-या राजमुद्रा अॅकॅडमीच्या मुलींचे कोपरगाव येथे स्वागत करून बालविवाह थांबविण्यासाठी विधीज्ञ बागेश्री जरंडीकर यांनी सर्वांना शपथ दिली.

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रास्तविकात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सभासद शेतकरी, कर्मचारी, उसतोडणी मजुर, चालक वाहक आदिंसाठी राबवित असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देवुन केंद्र व राज्य शासन अंगीकृत उपक्रमांची तंतोतंत अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले. 

रोटरी क्लब कोपरगावचे अध्यक्ष राकेश काले म्हणाले की, उसतोडणीसाठी मजुरांचे सातत्यांने स्थलांतर होत असते. त्यामुळे त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य हेळसांड होवुन मुले, मुली अशिक्षीत प्रमाण वाढते ते कमी करण्यासाठी अहमदनगरचे डॉ. गिरीष कुलकर्णी हे गेल्या ३५ वर्षापासुन स्नेहालय संस्थेअंतर्गत विविध सामाजिक कार्य करीत असल्याचे सांगितले.

विधीज्ञ शाम असावा याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, १६ ते २६ जानेवारी पर्यंत संपूर्ण जिल्हयात ४४१ किलोमिटरच्या सायकल यात्रेतुन चला बाई चला लग्नाला चला पथनाटयातुन बालविवाह प्रतिबंधक जनजागृती करून आजच्या घडीला भारतात ४७ तर राज्यात ३५ टक्के बालविवाह होतात. ते शुन्य टक्क्यापर्यंत खाली आणण्यासाठी सामुहिक प्रयत्न सुरू आहेत जिल्हयात या सायकल यात्रेला प्रतिसाद वाढत आहे.

प्रविण कदम म्हणाले की, गेल्या ४ वर्षात स्नेहालय संस्थेने उडान प्रकल्पांतर्गत ४०० बालविवाह थांबविले. भविष्यातील नागरिक सुजाण असावेत म्हणून उसतोडणी मजुरांच्या समस्या जाणून घेवुन त्याची सोडवणुक करण्याचा मानस आहे. समन्वयक सचिन खेडकर म्हणाले की, बालविवाह कायद्यांने गुन्हा आहे. राज्यात अहमदनगर जिल्हयात सर्वाधिक बालविवाह होतात ते कमी व्हावे म्हणुन बालविवाह मुक्त भारत, मानवाधिकारयुक्त भारत जनजागृतीसाठी स्नेहालय संस्थेने पुढाकार घेतला असे ते म्हणाले.

हनिफ शेख यांचेही भाषण झाले. रोटरी क्लब व संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने संचालक विश्वास महाले, ज्ञानेश्वर परजणे, राजेंद्र कोळपे, बाळासाहेब पानगव्हाणे, बाळासाहेब वक्ते, रोटरी क्लबचे विशाल आढाव, विरेश अग्रवाल, रोहित वाघ, सनि आव्हाड, विशाल मुंदडा, अमर नरोडे, डॉ. इम्रान सय्यद , डॉ महेंद्र गवळी, डॉ. विनोद मालकर, हर्षल जोशी आदिंच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.

याप्रसंगी उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजी देवकर, मानव संसाधन अधिकारी प्रदिप गुरव, सचिव विधीज्ञ तुळशीराम कानवडे, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, राजेंद्र देवकर, राजमुद्रा अॅकॅडमीच्या नंदा पांडुळे, स्नेहालय संस्थेच्या क्षेत्रीय अधिकारी तथा विश्वस्त संगिता शेलार (कोपरगाव), विकास सुतार, योगिता शिंदे, माधुरी वाघ, शेतकी व उस विकास विभागाचे सर्व सहायक, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, उसतोडणी मुकादम, आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे संचालक व रोटरीचे माजी अध्यक्ष रोहित वाघ यांनी आभार मानले. सुत्रसंचलन डॉ. राजन शेंडगे यांनी केले.