अनुलोम ‘ च्या माध्यमातून डॉ. निरज लांडे पाटील सन्मानित

प्रभू रामचंद्राची मूर्ती व सन्मान पत्र देऊन गौरव


शेवगाव प्रतिनिधी, दि . २१ : आयोध्येत सोमवारी (दि. २२ ) होणाऱ्या श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून उपमुख्यमत्री देवेंद्र फडणविस यांनी स्थापन केलेल्या ‘अनुलोम ‘(अनुगामी लोकराज्य महाअभियान ) प्रतिष्ठानच्या वतीने विशेष प्रतिनिधी मार्फत येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज लांडे पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रभू रामचंद्राची मूर्ती व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

फडणविस मुख्यमत्री असतांना ‘अनुलोम ‘ प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली आहे. या प्रतिष्ठान च्यावतीने आता पर्यंत जलसंधारणासारखी अनेक कामे करण्यात आली असून सध्या प्रतिष्ठान मार्फत पीएम किसान योजना, आयुष्यमान भारत कार्ड अशा विविध स्वरूपाची नागरिकांची वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागत आहेत.

विशेष योगदान दिलेल्या राज्यातील एकूण ३५८ तालुक्यातील एकेका बिनीच्या कार्यकर्त्याची निवड करण्यात आली असून प्रभू रामचंद्र मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने या कार्यकर्त्याच्या घरोघरी विशेष प्रतिनिधी पाठवून त्यांना सन्मानित करण्याचा अनोखा उपक्रम फडणविस यांनी राबविला आहे.

त्यासाठी शेवगाव तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. लांडे पाटील यांनी त्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार ज्येष्ठ कारसेवक ऊत्तमराव दहेरराय, नितीन भाडाईत, पांडूरंग लांडे पाटील, तालुका राष्ट्रीय स्वयं सेवक संघ चालक जगदीश धूत, डॉ. कृष्णा देहाडराय, बंडू रासने, हरिष शिंदे, सुरज लांडे पाटील, प्रा.नितीन मालानी, दत्ता फुंदे, विष्णु घनवट, अमोल माने, मच्छिंद्र बर्वे, यांचे प्रमुख उपस्थितीत अनुलोमच्या कार्यकर्त्या मेघा चिंतामणी यांनी श्री प्रभूराम चंद्राची मूर्ती व सन्मानपत्र देऊन डॉ. लांडे पाटील यांना सन्मानित केले.