छत्रपती शिवाजी महाराज हे सकारात्मक विचारांचे विद्यापीठ – स्वाती कोयटे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे भारत देशालाच नाही, तर जगाला अवगत आहे. त्यांची ओळख त्यांनी त्यांच्या कार्यातून करून दिली आहे. लोककल्याणकारी राजे, मॅनेजमेंट गुरू अशा वेग – वेगळ्या पदव्या त्यांच्या कार्यामुळेच मिळाल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यातून एक विचार दिसून येतो. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या कार्याची माहिती घेताना त्यांचे विचार ही अंगीकारले पाहिजे. त्यामुळे शिवराय हे एक नाव नाही तर सकारात्मक विचारांचे विद्यापीठ आहे. असे मत समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप कोयटे यांनी व्यक्त केले.

Mypage

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवजयंती उत्साहात संपन्न झाली. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे आणि शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या प्रमुख सौ.सीमा सोमासे यांनी केले.

tml> Mypage

कोयटे म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या विचारांची गरज असते. ते सकारात्मक विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्व आणि कार्यातून अभ्यासतो, पण ते विचार आपण जर आत्मसात केले तर भविष्यातील वाटचाल ही सुकर होते आणि त्यांचा विचार एक गुरु मंत्र ठरतो त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याची माहिती या कार्यक्रमामधून होणार आहे. 

Mypage

मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना समता इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य समीर अत्तार म्हणाले की, इंटरनॅशनल स्कूलचा प्रत्येक विद्यार्थी हा शिवाजी महाराजांचा मावळा आहे. त्यांनी त्यांच्या मावळ्यांना दिलेले शिकवण आजही आपल्या प्रत्येकामध्ये असणे गरजेचे आहे. त्यातूनच आपण चांगल्या प्रकारे गाव, तालुका, राज्य, देशाचे नाव उज्ज्वल करू शकतो. त्यांनी मावळ्यांसोबत लढाया करून स्वराज्य निर्माण केले आपल्याला त्यांचे सकारात्मक विचार सोबत घेऊन यशस्वी जीवनाच्या लढाया जिंकायची आहे.

Mypage

या प्रसंगी इ.७ वी तील श्रेया गवारे व राजेश्वरी तांबे यांनी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरील पोवाडा सादर केला.तसेच विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करून दाखवत उपस्थितांची मने जिंकली. इ. ८ वी तील विद्यार्थ्यांनी शिव काळातील युगत काव्य प्रकारावर नृत्य सादर केली. तसेच अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो. च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समता इंटरनॅशनल स्कूलला भेट देण्यात आला.

Mypage

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इ.७ वी तील राजवर्धन काळे व प्रतीक्षा ठोंबरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार शिक्षिका सना सय्यद यांनी मानले.

Mypage