राज्य मार्ग ०७ ची साडेसाती दूर, इतरही रस्त्यांना निधी देणार – आ. आशुतोष काळे

प्रलंबित शहाजापूर-चास नळी ते जिल्हा हद्द (सात मोऱ्या) रस्ता कामास प्रारंभ

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्य मार्ग-७ वरील शहाजापूर सुरेगाव-वेळापूर-कारवाडी-चासनळी ते जिल्हा हद्द (सात मोऱ्या) रस्त्याला १० कोटी निधी देवून या रस्त्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची या राज्य मार्ग ०७ ला लागलेली साडे साती दूर झाली असून नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या इतरही रस्त्यांना जास्तीत जास्त निधी देऊ अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या १० कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या राज्य मार्ग-७ वरील शहाजापूर-सुरेगाव-वेळापूर-कारवाडी-चासनळी ते जिल्हा हद्द (सात मोऱ्या) या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदाचे माजी संचालक राजेंद्र जाधव होते.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, मागील अनेक वर्षापासून देर्डे फाटा ते सात मोऱ्या तालुका हद्द रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे बाजारपेठेचे गाव असलेल्या चासनळी व रस्त्याच्या लगत असणाऱ्या अनेक गावातील व्यवसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले होते.

मागील अनेक वर्षापासून या रस्त्याला लागलेली साडे साती कधी दूर होईल या प्रतीक्षेत चासनळी व पंचक्रोशीतील गावातील नागरिक होते. त्यामुळे निवडून आल्यानंतर रस्ते विकासाचा अजेंडा हाती घेवून या महत्वाच्या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नातून या रस्त्याला १० कोटी निधी मिळवून राज्य मार्ग ०७ या रस्त्याची अनेक वर्षाची साडे साती दूर करण्यात यश मिळाले असून कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागत आहे याचे मोठे समाधान वाटते.

चासनळी व परिसरातील शेतकरी, नागरिकांसाठी मंजूर बंधाऱ्याचा विषय अतिशय महत्वाचा व जिव्हाळ्याचा आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असून त्या कामाला देखील लवकरच मंजुरी मिळणार आहे. विजेच्या बाबतीत चासनळी व परिसराचा विजेच्या अडचणी मार्गी लागणार असून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रयत्नातून शहा येथे उभारण्यात आलेल्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्राला कोळपेवाडी, पोहेगाव बरोबरच चासनळी सबस्टेशन जोडले जाणार आहे. त्यामुळे या भागाचा विजेचा प्रश्न देखील मिटणार आहे. 

शंभरी पार केलेले गोदावरी कालवे आवर्तन सुरु असतांना अनेक वेळा फुटत होते. मागील पाच वर्षात कालव्यांची कुठेही दुरुस्ती झाली नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना आवर्तनाचा लाभ मिळतांना अडचणी येत होत्या. त्यामुळे कालव्यांचे नुतनीकरण करणे अत्यंत गरजेचे होते. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून कालवे दुरुस्तीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडून ३०० कोटी निधी मंजूर करून घेतला असून प्रत्येक वर्षी १०० कोटी निधी मिळणार आहे. त्यापैकी प्राप्त झालेल्या ५५ कोटी निधीतून अनेक ठिकाणी कालव्यांच्या दुरुस्तीची कामे सुरु असून त्यामुळे आवर्तन काळात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे.

कालव्यांची दुरुस्तीची कामे सुरु असल्यामुळे पाटबंधारे विभागाला आवर्तन सोडता आले नाही. मागील तीन वर्षात यापूर्वी ज्या ज्यावेळी आवर्तनाची गरज भासली त्या त्यावेळी आवर्तनाच्या नियोजित वेळापत्रकाच्या तारखेच्या अगोदर आवर्तन मागून घेतले आहे. यावेळी देखील पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याशी वाद घालून आवर्तन सोडायला भाग पाडले असते. पिकांना पाणी आवश्यक आहे त्याचबरोबर कालव्यांची कामे देखील तेवढीच महत्वाची आहेत. त्यामुळे कालव्यांची कामे पूर्ण होताच लवकरात लवकर आवर्तन सोडले जाईल.

राज्य मार्ग ०७ या रस्त्याबरोबरच एम.डी.आर.०८ मळेगाव थडी-सांगवी भुसार-मायगाव देवी-मंजूर-चासनळी-वडगाव-बक्तरपूर-सोमठाणे या रस्त्याला देखील ७ कोटी निधी मंजूर आहे. या रस्त्याचे देखील काम लवकरच सुरु होणार असून अगस्ती नाला व काळधोंडी नदीवरील पुलांसाठी निधी देणार – आ. आशुतोष काळे.

मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पहिल्या आवर्तनाच्या वेळी शेतकऱ्यांनी पाणी उचलले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कालव्याचे आवर्तन लवकर बंद केले. त्याचा परिणाम आता जाणवत आहे.काम बंद होताच दुसऱ्या दिवशीच आवर्तन सोडले जाईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज दाखल करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.   

  यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, नारायणराव मांजरे, पंडितराव चांदगुडे, भास्करराव चांदगुडे, ज्ञानदेव मांजरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, संचालक सुधाकर रोहोम, डॉ. मच्छिन्द्र बर्डे, सचिन चांदगुडे, अनिल कदम, शंकरराव चव्हाण, अशोकराव मवाळ, श्रीराम राजेभोसले, सुनील मांजरे, मनोज जगझाप, माजी संचालक, अरुण चंद्रे, मिननाथ बारगळ, सोमनाथ घुमरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकरव दंडवते, 

गौतम कुक्कुट पालनचे चेअरमन विजयराव कुलकर्णी, व्हा. चेअरमन खंडेराव शिंदे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे संचालक सुदामराव वाबळे, महेंद्रजी काळे, सुभाष गाडे, दिलीप चांदगुडे, सोमनाथ चांदगुडे, पुंडलिक माळी, सुभाष कदम, दगु गोरे, भिकाजी सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकारी वर्षराज शिंदे, शाखा अभियंता दिलीप गाडे आदींसह पंचक्रोशीतील मढी बु, शहाजापुर, सुरेगाव, कोळपेवाडी, वेळापूर, कारवाडी, रवंदे, सांगवी भुसार, हंडेवाडी, मंजूर, चासनळी, मोर्विस, वडगाव, बक्तरपूर,  धामोरी, मायगाव देवी, मळेगाव थडी, सोनारी आदी गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.