महसूल कर्मचारी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शेवगाव अव्वल

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : महसूल कर्मचा-याच्या नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत शेवगाव येथील महसूल अधिकारी कर्मचा-यांच्या रॉयल्स संघाने हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर यावेळी झालेल्या कबड्डी स्पर्धत शेवगाव पाथर्डी उपविभागीय कार्यालयाच्या संघाने देखील बाजी मारुन प्रथम क्रमांकावर मोहर उमटवली आहे.

       हॉलीबॉल स्पर्धेत शेवगाव महसूल विभागाच्या संघात पुरवठा निरीक्षक विजय चव्हाण यांच्यासह तलाठी पी. पी. मगर, ए.आर.हिंगे, मच्छिंद्र शिंदे, मंगेश कदम यांनी आपल्या बहारदार खेळाने उपस्थित क्रीडा रसिकांची वाहवा मिळविली.

विजेत्या दोन्ही संघाचे प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार छगनराव वाघ, प्रशिक्षणार्थी तहसीलदार राहुल गुरव, नायब तहसीलदार मयूर बेरड आदींसह नूतन जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन  केले. विजेत्या संघाचे परिसरातून कौतुक होत आहे.