समृध्दी महामार्गाचा पहीला दोघांनी केला एकञ
कोपरगाव प्रतिनिधी दि. ५ : देशातला सर्वात लांब व नाविण्यपूर्ण असलेला समृध्दी महामार्ग अर्थात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गा लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी होणार असल्याने या महामार्गावरील प्रवासाची चाचणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी घेतली. नागपुर ते कोपरगाव शिर्डी येथपर्यंतचा प्रवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारचाकीमधून केला आणि त्यांच्या प्रवासाची गती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होती.
नागपुर-मुंबई हा हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग ७०१ किलोमीटर लांबीचा आहे. यातला नागपुरते शिर्डी हा ५२० किलोमीटर मार्ग लोकार्पणासाठी तयार झाला आहे. या मार्गाच्या पाहणीसाठी नागपुर येथून सकाळी सुरू केलेला दौरा आज संध्याकाळी शिर्डी येथे पूर्ण झाला.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील सर्कल जवळ प्रवासाची सांगता मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली यावेळी कोपरगावच्या शिर्डी सर्कल जवळ पोहोचले तेव्हा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, शिवसेनेचे सदाशिवराव लोखंडे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले.
गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेला समृध्दी महामार्ग कधी चालु होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या समृध्दी महामार्गाच्या कामाला शुभारंभ झाला होता. त्यानंतर सरकार बदले कामाची गती कमी जास्त झाल्याने या महामार्गाचा शुभारंभ होण्यास विलंब लागला माञ भाजप राज्याच्या सत्तेत असतानाच याचा शुभारंभ होतोय.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमिटरचा प्रवास कारने केला त्यांच्या गाडीचा वेग ताशी १४० किलो मिटरचा होता अशी चर्चा होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीची स्टेअरींग उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच्या ताब्यात घेवून योग्य वेळी गती वाढवून शिंदे यांच्या प्रवासाची संपूर्ण गती आपल्या हाती ठेवली होती. या संपूर्ण प्रवासा संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, इतका मोठा प्रवास स्वतः गाडी चालवून केला तरीही मी थकलो तर नाहीच. पण ठिकठिकाणी नागरिकांनी केलेल्या उस्फूर्त स्वागतामुळे मी भारावून गेलो.
“हा महामार्ग संपूर्ण महाराष्ट्रात समृध्दी आणणार आहे. हा विश्वास प्रवासादरम्यान गावोगावी झालेले स्वागत स्वीकारताना लोकांच्या डोळ्यात पाहात होतो. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’… तो सार्थकी लागल्याची भावना नागपुर ते शिर्डी हा प्रवास पूर्ण करताना झाली. लवकरच पुढचा १८० किलोमीटरचा टप्पाही आता जलदगतीने पूर्ण करण्याची उर्जा घेऊनच आज घरी परतलो असेही ते म्हणाले.