शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : शेवगावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचा उद्या रविवार ( दि४ )पासून सुरू होणारा वार्षिक यात्रोत्सव प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही विविध धार्मिक व मनोरंजनात्मक भरगच्च कार्यक्रमाने होत आहे. त्याची धामधूम सध्या जोरात सुरू आहे.
आज शनिवारी कावडी व गंगास्नानाने यात्रोत्सवास प्रारंभ झाला असून उद्या रवीवारी मुख्य यात्रा छबिना व शोभेची दारू व विद्युत रोषणाई, सोमवारी दि.५ रोजी पुणे येथील नामवंत गायिका संगीता भावसार निर्मित संगीत राज ओर्क्रेस्टा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी ३ वा. कुस्त्यांच्या जंगी हगामा होणार आहे.
यात्रेच्या निमित्ताने बालगोपाळांसाठी महाकाय इलेक्ट्रिक पाळणा, ब्रेक डान्स, फिरती रेल्वे, रेम्बो, जम्पिंग आदी विविध खेळण्यांची साधने येथील खंडोबामैदानावर दाखल झाली असून खेळण्यांची दुकाने, विविध खाद्य पदार्थाची दुकाने खंडोबामैदानावर लागली आहेत. रविवारी मुख्य यात्रेच्या दिवशी शहर व परिसरातील नागरिक श्री खंडोबा देवाचे मनोभावे दर्शनासाठी खंडोबामंदिर व प्रांगण सुशोभित करण्यात आलेआहे.
श्री खंडोबा देवाच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमात नागरिक व भक्त गणांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून यात्राउत्सवाची शोभा वाढविण्याचे आवाहन समस्त पंच मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.