साखर उद्योगातील अभ्यासक बिपीनदादा कोल्हे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.४ : एका बाजूला राज्यासह देशातील सहकारी साखर कारखाने आर्थीक डबघाईने बेजार होवू बंद पडत असताना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांनी नवनवीन संशोधन करुन उस उत्पादनात कमालीची वाढ करण्याचे तंञज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर जावून विकसित करीत साखर उद्योगात नवी क्रांती केली.

Mypage

साखर उद्योगात अमुलाग्र बदल घडवून देशातील अग्रक्रमांकाने गौरवास्पद कामगिरीतून अनेक विक्रम करणारा साखर कारखाना अर्थात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला त्यांच्या कार्याची दखल घेवून संजीवनी उद्योग समुहाचे नाव जागतीक पातळीवर पोहचवले. कोल्हे यांच्या साखर उद्योगातील भरीव योगदानाबद्दल शुगरकेन ब्रिडींग इन्स्टीटयूट कोईमतूर अंतर्गत सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘जीवन गौरव’ पुरस्कार ३० नोव्हेंबर रोजी कोईमतूर येथील कार्यक्रमात शुगरकेन ब्रिडींग इन्स्टीट्युट संस्थेचे माजी संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन.विजयन नायर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन बिपीनदादा कोल्हे यांना सन्मानित करण्यात आले.

tml> Mypage

हा बहुमानाचा पुरस्कार बिपिनदादा कोल्हे यांनी सहकारातील जानते नेते माजी मंञी स्व. शंकरराव कोल्हे व कोल्हे कारखान्याचे सर्व सभासद शेतकऱ्यांच्या चरणी समर्पित केला आहे. बिपीनदादा कोल्हे यांनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातुन अनेक ऐतिहासिक निर्णय घेवून साखर उद्योगाला नव्या दिशा दिल्याने आज साखर उद्योगाला चालना मिळत आहे. म्हणूनच बिपीनदादा कोल्हे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Mypage

या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्यूट संस्थेच्या संचालिका डॉ. जी. हेमप्रभा बोलताना म्हणाल्या की, सहकारी साखर कारखानदारी रुजवण्याचे टिकवण्याचे काम सहकार महर्षी माजी मंञी शंकरराव कोल्हे यांनी संपूर्ण आयुष्यभर केले.म्हणून पुढच्या वर्षापासून सहकारी साखर उद्योगात माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या नावे प्रतिष्ठेचा देश पातळीवर पुरस्कार या संस्थेचेवतीने दिला जाणार आहे.

Mypage

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने साखर उत्पादनांबरोबरच आसवनी त्यावरील विविध रासायनीक उपपदार्थांची निर्मीती करून सहवीज निर्मीती, बायोगॅस, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मीती करून देशपातळीवर नावलौकीक मिळविला आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिपीनदादा कोल्हे यांनी कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचे उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याबाबत धडक कृती विकास कार्यक्रम राबविले. उस संशोधनातील शिखर संस्था असलेल्या शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्यूट सोसायटी कोईमतूर अंतर्गत उसाच्या विविध विकसीत जातीचे उस बेणे सभासदांसह शेतकऱ्यांना उपलब्ध करून कमी पाण्यांत, कमी श्रमात अधिक उस उत्पादन कसे मिळेल यावर सातत्यांने भर दिला आहे. असेही त्या म्हणाल्या.

Mypage

सत्कारास उत्तर देतांना बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, सध्या उस उतारा आधारीत दर दिले जात असल्याने प्रती हेक्टरी उस व साखर उतारा देणाऱ्या उस जातींची गरज आहे आणि त्यासाठी उस संशोधन केंद्र कोईमतूर संस्थेने को ७२१९, को ८६०३२ सारख्या उस जाती विकसीत करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जगात ब्राझील मध्ये १५ टक्के साखर उतारा देणाऱ्या उस जाती विकसीत झाल्या आहे, त्या भारतात विकसीत झाल्या तर साखर उद्योगाचे भवितव्य अधिक उज्वल होईल. ऊस संशोधनात कोईमतुर संस्थेने मोठ्या प्रमाणात सहकार्य देऊन शेतकऱ्यांचे प्रति हेक्‍टरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले आहे.

Mypage

साखर उद्योगातील भरीव योगदान बद्दल शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोईमतुर यांनी आपला जो सन्मान केला आहे तो व्यक्तिगत माझा नसून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचा असल्याचे ते म्हणाले.

Mypage

दरम्यान बिपीनदादा कोल्हे हे कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे २८ वर्षे चेअरमन म्हणून काम करताना कारखान्याच्या ऊस उत्पादकांच्या समस्या जाणुन होते. पुर्वी ऊसाचे उत्पादन एकरी केवळ १८ ते २५ टन होत होते. माञ बिपिनदादा कोल्हे यांच्या अथक प्रयत्नातुन सध्या एकरी ४८ ते ६० टन उत्पादन वाढवले आहे. बिपीनदादा कोल्हे यांनी आत्तापर्यंत देशातील कृषि संदर्भातील अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले.

Mypage

भारतीय कृषि अनुसंधान नवी दिल्लीचे संचालक असताना त्यांनी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करून कृषि संशोधन करणाऱ्या शास्ञज्ञांची रिक्त पदे भरण्यासाठीचा आग्रह धरला आणि कृषि क्षेञात अनेक संशोधकांनी संशोधन करुन नवी क्रांती केल्यामुळेच कृषि उत्पादनात कमालीची वाढ होत गेली. कोल्हे यांच्या योगदानामुळे त्यांना हा बहुमान मिळाला असल्याच्या भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. या पुरस्काराबद्दल बिपिनदादा कोल्हे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.या पुरस्कार सोहळ्याला शुगरकेन ब्रिडींग इन्स्टीट्युट संस्थेचे माजी संचालक डॉ. एन.विजयन नायर, संचालिका डॉ. जी. हेमाप्रभा, ऊस विकास अधिकारी शिवाजी देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.