राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पुतळा जाळून निषेध

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुषा बद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधार्थ येथील क्रान्ती चौकात विविध संघटनांच्या संतप्त शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळून तीव्र शब्दात धिक्कार केला.

 आज सोमवारी क्रांती चौकात शेवगांव तालुका मराठा सेवा संघ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, शाहु, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचार मंच, संभाजी ब्रिगेड, म्हसनजोगी समाज विकास व उन्नती सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य), पिंजारी मन्सूरी जमात शेवगाव, यांच्यासह शहरातील विविध शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून पुतळा दहन करण्यात आला.

  यावेळी निलेश उर्फ मुन्ना बोरुडे, मराठा सेवा  संघाचे तालुका अध्यक्ष विजयराव देशमुख सामाजिक कार्यकर्ते  अविनाश देशमुख, शितल पुरनाळे  यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना  व्यक्त केल्या व  जोरदार  घोषणा  देऊन सातत्याने स्पोटक विधान करणाऱ्या  राज्यपालांना पाठीशी घालणाऱ्या मोदी सरकारचा आणि राज्यातील युती सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

राज्यात वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, राज्यातील  उद्योग अन्यत्र पळवीणे, महिलांवरील वाढते अत्याचार, या संदर्भातील केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी असे भावनिक वाद जाणुन बुजुन उपस्थित करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे पाप सत्ताधारी करत असल्याची टीका यावेळी वक्त्यांनी केली.