रब्बी हंगामासाठी पिक कर्ज उपलब्ध व्हावे शेतक-याची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ :  या वर्षी आक्टोंबर अखेरपर्यंत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टी तर एका मंडळात सततच्या पावसामुळे विविध खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतीचे अर्थकारण अडचणीत आले.

शेतामध्ये पाणी साचल्याने यंदाचा रब्बी हंगाम काहीसा लांबणीवर पडला. सध्या तालुक्यात रब्बी पेरण्यांना वेग आल्याचे चित्र आहे. तालुक्यात आज अखेर ६ हजार ४५ हेक्टर क्षेत्रात रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. आधीच खरीप हंगाम वाया गेला आहे . त्यात रब्बीही लांबणीवर पडल्याने शेतकरी संकटात सापडला. शेतक-यांना बियाणे व खतासाठी मदत व्हावी. तसेच रब्बी हंगामासाठी पिक कर्ज उपलब्ध व्हावे अशी शेतक-याची रास्त अपेक्षा आहे.

 तालुक्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र (उसाशिवाय ) ८४ हजार ५३५ हेक्टर असून  गेल्या काही वर्षापासून  तालुक्यातील शेतक-यांचा कपाशीकडे कल वाढला आहे. तालुक्यात कपाशीची जिल्ह्यात सर्वाधिक लागवड शेवगाव तालुक्यात होते. एकंदरीत कपाशी उत्पादनात शेवगाव तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.

त्यामुळे खरीप व रब्बी हंगामाच्या सरासरी क्षेत्रात झालेला मोठा बदल लक्षात. घेता कृषी विभागाने खरीप व रब्बीच्या सरासरी क्षेत्रात योग्य तो बदल करून त्या प्रमाणे शेतक-यांना शासनाच्या विविध सोयी सवलतीचा लाभ मिळेल या पद्धतीने सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

       तालुक्यात रब्बीची झालेली  एकूण पेरणी अशी  गहू १ हजार ५२७ हेक्टर, रब्बी ज्वारी १ हजार १५७ हेक्टर , मका १३७, हरभरा २ हजार १६१. करडई १, मका ३८७, ज्वारी / कडवळ २३८, लुसरसर्न ग्रास ३१८, उस १००, नेपिअर ग्रास १७६, कांदा ५३३, बटाटा / टोमाटो  प्रत्येकी ७, भाजीपाला २३४,