श्रीक्षेत्र चासनळी ते पैठण पायी दिंडी सोहळा

Mypage

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २७ : तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ते पैठण पायी दिंडी सोहळा सालाबादप्रमाणे याही वर्षी २ ते १४ मार्च दरम्यान आयोजित केला असुन त्याचे हे तिसावे वर्ष असल्यची माहिती संस्थापक ह. भ. प. बाबुराव महाराज चांदगुडे यांनी दिली.

Mypage

    चांदगुडे म्हणाले की, अध्यात्माची सांगड विज्ञानाबरोबर घालुन त्यातुन वारकरी सांप्रदायाचा प्रसार करून संत एकनाथांचे विचार जनसामान्यांपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न आहे. या दिंडीत असंख्य अबाल वृध्द वारकरी सहभागी होत असतात. १४ मार्च रोजी पैठण येथे बाजार समिती लहेरसिंग चौहान आडत दुकान येथे दिंडी उतरणार आहे.

Mypage

या दिंडीतुन ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, जलसाक्षरता, पर्यावरण संरक्षण, बेटी बचाओ बेटी पढाओ, हुंडाबंदी, आत्मनिर्भरता, प्रौढशिक्षण, स्पर्धात्मक परिक्षा जनजागरण, अंधश्रध्दा निर्मुलन, भ्रमणध्वनी अभासी तंत्राचा वाढत्या वापरातुन निर्माण होणा-या समस्याबाबत जनजागृती असे विविध उपक्रम राबविले जातात, या कार्याला असंख्य वारकरी बांधव तसेच समाजातील विविध दानशुर व्यक्तींचे पाठबळ मिळत आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *