अर्धवट खोदून ठेवलेला खंदकनाला बनला मृत्यूचा सापळा – मंगेश पाटील

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : रोज अंधारात पहाटे ५ वाजता कोपरगावकरांसाठी रोजचा भाजीपाला लिलाव या नाल्या जवळील असलेल्या मार्केटच्या जागेत भरतो. पहाटे आंधारात शेतकरी, व्यापारी याच्या छोट्या मालवाहतूक रिक्षा, टेम्पो, मोटरसायकल या नाल्याला खेटून मोठ्या प्रमाणात जात असतात.  दोन रिक्षा ही बसत नाही या रस्त्याहून त्यांमुळे नाल्यात रिक्षा, टेम्पो, मोटरसायकल वर भाजीपाला आणणारे पलटी होऊन, सरकून, घसरून अपघात, जीवित हानी होऊ शकतो.

Mypage

काही महिन्यांपूर्वी खंदकनाल्या मुळे काही भागात पावसाळ्यात पाणी घरात घुसुन पुरग्रस्त परिस्थिती झाली होती आणि अनेक गोरगरीबांचे कुटुंबांची नुकसान होऊन आर्थिक परिस्थिती बिकट झाली. अशी परिस्थिती परत येऊ नये म्हणुन  नगरपालिका प्रशासनाने खंदकनाला रूंद व खोल करण्यात आला. या खोदकामात आज हि अपुर्णता आहे.

Mypage

   नाल्यातील दोन पाईप काढले गेलेच नाही आणि खोदकाम झाल्यावर त्या खोदकामाची काही माती त्या नाल्या शेजारी आहे जी आता वाळुन परत नाल्यात जात आहे आणि नाल्याची किनार हि भुईसपाट होत आहे. त्यामुळे सदर नाल्या शेजारून जी रहिवासी व उद्योगाची संदर्भातील व्यापारी बांधवांची येथुन मोठ्या वाहनांची वर्दळ असते पण चुकुन दोन वाहन येथुन ये जा करत असेन आणि अनाहुत पणे जर काही झालं तर या नाल्यात वाहन अपघात ग्रस्त होऊन अनेकांचा जिव हि जावुन कोणाचे कुटुंब उध्वस्त होऊ शकते.

Mypage

तसेच या भागात व्यवसायानिमित्त लोकांची मोठी वर्दळ असते काहीजण आपल्या आस्थापनात असता आणि हा नाला उगडा असल्याने त्याचे दुर्गंधी डास आणि यामुळे रोगांची क्षृखंला हि सुरू होऊ शकते याचा त्रास या भागातील व्यावसायिक व छोटे दुकाने यांना होत आहे.

Mypage

       सदर हा नाला (नगरपालिका हद्दी ) जिथुन सुरू झाला तिथुन  खोल करत त्यास संरक्षण कठडे बसवावे. आजचा खंदकनाल्याची परिस्थिती दैनीय झाली असुन नाल्याचे रूप पाहता जनतेच्या आरोग्याशी खेळणारी गटार झाली आहे. यामुळे शहराच्या वैभवाला कलंक ठरत आहे. अर्थात काय तर खंदक नाला बनला आहे मृत्यूचा सापळा…! याकडे संबंधित प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन वरील संबंधित सुधारणा या नाल्याची करावी अशी जनतेची हि मागणी आहे. तसेच प्रशासनाने आता अपघात होण्याची वाट न पाहता सर्वात अगोदर त्वरीत लक्ष देऊन खंदकनाला शहरासाठी जो अविशाप ठरत आहे त्यास वैभवाची शान करावा आणि खंदन नाल्याचे काम त्वरीत मार्गी लावावे.

Mypage