मैदानात खिलाडूवृत्ती जोपासा – चैतालीताई काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि २८ : कोणत्याही स्पर्धेत हार-जीत हा त्या स्पर्धेचा एक भाग असून स्पर्धेत हार जीत ठरलेली असते. त्यामुळे मिळालेल्या यशाने हुरळून जावू नका व अपयशाने खचून जावू नका. स्पर्धेत यश-अपयश येणारच मात्र त्याचा विचार न करता मैदानात नेहमी खिलाडूवृत्ती जोपासा असा मौलिक सल्ला जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी दिला.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे वाल्मिकआप्पा कोळपे युवा प्रतिष्ठाण आयोजित आमदार चषक २०२३, सुरेगाव प्रीमिअर लीग भव्य प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन नुकतेच जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सुरेगाव येथील कु. आकांक्षा वायकर हिने मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मिकराव कोळपे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, माजी सरपंच सौ. सुमनताई कोळपे, उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर, माजी उपसरपंच सुनील कोळपे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वरज हाळनोर, गौतम पब्लिक स्कुलचे प्राचार्य नूर शेख, 

नंदकिशोर निंबाळकर, अंबादास धनगर, राजु कोळपे, अनिल कोळपे, ग्रामविकास अधिकारी दिगंबर बनकर, एकनाथ सुपनर, सिद्धार्थ मेहेरखांब, विशाल लोंढे, बबन ढेकळे, तुकाराम कोळेकर, मोतीराम निकम, यशवंत निकम, राजेंद्र शुक्ला, व्यंकटेशबोलगमवार, सौ. वनिता सुपनर, सौ. शोभा धनगर, सौ. ज्योती वायकर आदींसह सहभागी संघांचे खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते