संजीवनीच्या सार्थकची राष्ट्रीय पातळीवरील तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सार्थक निलेश बडजाते याने तलवारबाजीच्या इप्पी या प्रकारात प्रथम जिल्हा व नंतर विभागीय पातळीवर यश संपादीत करत थेट जम्मु-काश्मिर मध्ये घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय  पातळीवरील आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व तलवारबाजीचे कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Mypage

सार्थकने प्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये श्रीरामपुर येथिल स्पर्धेत यश मिळविले व त्यानंतर पुणे येथे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेमध्येही यश संपादन करून पुणे विद्यापीठ अखत्यारीतील सर्व प्रकारच्या महाविद्यालयांमधुन अव्वल स्थान मिळवुन सा. फु. पुणे विद्यापीठात बहुमान मिळविला. सद्य परीस्थितीत सा.फु. पुणे विद्यापीठाचा कार्यविस्तार पुणे, अहमदनगर व नाशिक  या तीन जिल्ह्यात  असुन सुमारे ७०५ असे पारंपारीक व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या  संलग्नीत संस्था कार्यरत आहे.

Mypage

यासर्व संस्थांमधुन आपल्या कौशल्याच्या आणि संजीवनी मधुन मिळालेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर थेट राष्ट्रीय पातळीवर धडक मारली आहे, ही बाब संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे कोपरगांव सारख्या ग्रामिण भागात असुन हे महाविद्यालय सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्यांचे सार्थकच्या निवडीने सिध्द केले, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Mypage

सार्थकच्या या यशाबद्धल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. तसेच अमित कोल्हे यांनी सार्थकचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, क्रीडा संचालक प्रा. गणेश  नरोडे उपस्थित होते.

Mypage