कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे ९.१० लक्ष रुपये निधीतुन करण्यात येणाऱ्या श्री मारुती मंदीर ते स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आणि ५ लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या सामाजिक सभागृह व अंगणवाडी समोरील रस्ता व १६.७५ लक्ष रुपये निधीतून फिजिकल फिटनेस रिक्रिएशन संकल्पनेवर आधारित क्रिडा साहित्याचा लोकार्पण सोहळा नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला असून यावेळी त्यांनी ७.६५ कोटीच्या पाणी योजनेचा आढावा घेवून नियोजित पाणी योजनेच्या तळ्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
ते म्हणाले की, मागील अनेक वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांबरोबरच मायगाव देवीचा देखील पाणी प्रश्न प्रलंबित होता.नागरिकांना विशेषत महिला भगिनींना होणारी अडचण लक्षात घेवून मतदार संघातील इतर गावांबरोबरच मायगाव देवीचा देखील पाणी प्रश्न सोडविण्यात यश आले याचा मनस्वी आनंद वाटतो. ही पाणी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी या पाणी योजनेचे तळे ज्या ठिकाणी प्रस्तावित आहे त्या ठिकाणी या तळ्याला भविष्यात कोणताही धोका होणार नाही याची काळजी घ्या व लवकरात लवकर पाणी योजनेचे काम पूर्ण करा आदी सूचना दिल्या.
यावेळी नारायण मांजरे, ज्ञानदेव मांजरे, श्रीकृष्ण गाडे, सुदामराव गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीराम राजेभोसले, सुनील मांजरे, मनोज जगझाप, दगु भाकरे, भास्करराव वाघ, सरपंच दिलीप शेलार, उपसरपंच मुकुंद गाडे, प्रवीण भुसारे, काशिनाथ गाडे, धोंडीराम गाडे, साहेबराव गाडे, सुभाष साबळे, मोतीराम मोकळ, भगवान गाडे, दिलीप गाडे, सचिन गाडे, श्रीकांत गाडे, श्रावण चुंबळे, बाबासाहेब गाडे, बापूराव गाडे, राजु गाडे, जगणराव शेलार, शिवाजी नाजगड, मुन्ना शेख, दशरथ माळी, अण्णासाहेब गाडे, रामराव गाडे, सुनील गाडे, संदीप जगताप, गोरक्षनाथ खैरे, आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.