श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल व ब्राह्यण सभा आयोजित रोगनिदान शिबिरात २८० रुग्णांची तपासणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : ब्राह्यण सभा, कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने शहरातील सर्वासाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उदघाटन शिर्डी येथिल मानसोपचार तज्ञ डाॕ.ओंकार प्रबोध जोशी यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस.जे.एस.हाॕस्पीटलचे संस्थापक चांगदेव कातकडे होते. 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, माजी उपनगराध्यक्ष सुधाप्पा कुलकर्णी , प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, डाॕ.रविंद्र कुलकर्णी,डाॕ.प्रिया जोशी, डाॕ.अनिकेत कुलकर्णी, डाॕ.शंतनु कुलकर्णी, एस.एस.बागडे उपस्थित होते.  

ब्राह्यण सभेच्या या उपक्रमाला आम्ही कायमच सहकार्य करु असे स्पष्ट करुन एस.जे.एस.हाॕस्पीटल मध्ये आधुनिक मशिनरी द्वारे रुग्णांची तपासणी होत असुन नुकतेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कर्करोग तपासणी तज्ञ डाॕक्टर्स च्या मदतीने होणार असल्याचे सांगितले. श्री.चांगदेव कातकडे यांनी सांगितले.

डाॕ.ओंकार जोशी यांनी ब्राह्यण सभेचा हा उपक्रम स्तुत्त यापुढे मनः शांतीसाठी मानसोपचार शिबिर आयोजित करण्याचे मानस व्यक्त  केला.प्रसिध्द बांधकाम प्रसाद नाईक यांनी अशा प्रकारचे सर्व रोगनिदान शिबिर दरवर्षी या ब्राह्यण सभेच्या वर्धापन दिना निमित्तानं आयोजित करण्याचे जाहिर केले.

         या शिबिरांमध्ये रक्तदाब, शुगर, टु डीईको, ईसीजी, नेत्रविकार, फीजिओथिरेपी, त्वचाविकार  इत्यादी आजारांवर तपासणी  करण्यात आली. गरजुना मोफत औषधे देखिल वितरीत करण्यात आली. या शिबिरात अनुभवी तज्ञ डाॕक्टर प्राचार्य यांचे वतीने रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन व सल्ला दीला गेला.ज्या रुग्णांना पुढील तपासणीची आवश्यकता आहे अशा रुग्णांना हाॕस्पीटल मध्ये  निमंत्रित करण्यात आले आहे. 

प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवर आणि तज्ञ डाॕक्टरच्या पथकांचे स्वागत ब्राह्यण सभेचे सदस्य अनिल कुलकर्णी यांनी केले. भगवान परशुराम यांचे प्रतिमा पुजन, दिपप्रज्वलन करुन शिबिराची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयेश बडवे यांनी केले तर आभार संजीव देशपांडे यांनी मानले. या शिबिराचा लाभ २८० रुग्णांनी घेतला. 

जनार्दन स्वामी हाॕस्पीटलचे वैदयकीय पथकांमध्ये डाॕ.एफ.एस.बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॕ.सायली ठोंमरे, डाॕ.प्रशांत सगळगिळे, डाॕ.अनिरुध्द उबाळे, डाॕ.साळवे, डाॕ.गीता गिरमे, डाॕ.बत्रा, डाॕ.शंतनु कुलकर्णी, डाॕ.सावनी येरनाळकर व श्री.विजय कडु यांचा समावेश होता.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र जवाद,बी.डी.कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, सहसचिव संदीप देशपांडे,खजिनदार जयेश बडवे,सहखजिनदार योगेश कुलकर्णी , संघटक महेंद्र कुलकर्णी , जेष्ठ सदस्य वसंतराव ठोबरे, संजीव देशपांडे, मिलिंद धारणगांवकर, अनिल कुलकर्णी, अॕड.सौ.श्रध्दा जवाद, सौ.वंदना चिकटे, अजिंक्य पदे, सदाशिव धारणगांवकर आदिनी विशेष परीश्रम घेतले.

या शिबिराला शहरांतील मान्यवरांनी भेट देवुन या उपक्रमांचे कौतुक केले तसेच एस.जे.एस.हाॕस्पीटल च्या वतीने लवकरच या ठीकाणी आठवड्याच्या दर शनिवार होमीओपॕथी उपचार करीता तपासणी केंद्र सुरु करणार असल्याचे नियोजित आहे असे जाहिर करण्यात आले.