खाजगी कोचिंग क्लासवालेच चालवतात काॅलेज –  महसूल मंञी राधाकृष्ण विखे पाटील

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ :  शिक्षणाच्या पविञ मंदिरातून देशाची भावी पिढी निर्माण होते. त्याच पविञ शिक्षण मंदीरात खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी धुमाकुळ घातला आहे. सध्या कोचिंग क्लासवालेच काॅलेज चालवतात अशी खंत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. 

 कोपरगाव तालुक्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी एका कार्यक्रमात मंगळवारी बोलताना मंञी विखेंनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, सध्या शिक्षणाचा बाजार झालाय. आज काल परीक्षांना सुध्दा महत्त्व राहीले नाही. कोचिंग क्लासेसवाल्यांनी  शिक्षण यंञणेवर ताबा घेतला आहे. बऱ्याच ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस वाल्यांनी ५०% नफ्यावर काॅलेज चालवायला घेतले आहेत.

काॅलेज चालवण्यासाठी कोचिंग क्लासेसने फिफ्टी फिफ्टीचा फाॅरम्युला सुरू केला हि दुर्दैवी बाब आहे. यावर शिक्षण विभाग कसं नियंत्रण आणेल हे माहीत नाही अशी खंत खुद्द राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. विखे पाटील यांच्या सर्वाधिक शिक्षण संस्था राज्यात व जिल्ह्यात आहेत. शिक्षण यंञणेतील सर्व बारकावे विखे पाटील यांना माहिती आहेत. शिक्षण क्षेञात खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी पालकांसह संबंधीत संस्थांना आपल्या जाळ्यात ओढुन आपली झोळी भरून गडगंज होत आहेत.

यावर प्रशासनाने वेळीच लक्ष घालणं गरजेचे आहे. जिथे महसूल मंञी म्हणतात की, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना इतके महत्त्व राहीले नाही तर मग शिक्षण क्षेञात किती अंधाधुंद कारभार सुरु असेल. सर्व सामान्य नागरिकांच्या मुलांना सहजासहजी कमी पैशात खरच दर्जेदार शिक्षणाचा लाभ होत असेल का? जिथे ५०% फाॅरम्युल्यावर काॅलेज चालत असतील त्या काॅलेज दर्जा व गुणवत्ता कशी असणार. अशा शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी धोक्याच्या असुन पालकांच्या भावनांशी खेळ खेळणाऱ्या आहे.