कोकमठाण येथील गंगागिरी महाराजांचा १७५ वा सप्ताह ऐतिहासिक ठरला – महंत रामगिरी महाराज

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. १८ :  महाराष्ट्राची भूमि ही नवरत्नांची खाण असून साधू-संत महंतांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली आहे. गंगागिरी महाराजांनी सप्ताह परंपरा सुरू केली त्याला १७५ वर्षे पुर्ण झाली, दक्षिणकाशि गोदावरी नदी कोकमठाण तीर्थक्षेत्रात संपन्न झालेला १७५ वा सप्ताह सोहळा ऐतिहासिक व लक्षणीय ठरला यात सर्व ज्ञात अज्ञात घटकांनी केलेले काम वाखाणण्याजोगे होते असे प्रतिपादन सरलाबेटाचे महंत प. पू. रामगिरी महाराज यांनी केले. भक्तीचा महाकुंभ आणि ज्ञानदानाचा यज्ञ येथे अखंडपणे पार पडला. 

 श्रीक्षेत्र कोकमठाण येथे १७५ व्या सप्ताहाचे ध्वज अवतरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख विश्वस्थ प. पू. रमेशगिरी महाराज व जंगली महाराज आश्रमाचे संत महंत होते.

  प्रारंभी भिवराज जावळे यांनी सप्ताह काळातील सर्व हिशोबाचे वाचन केले. सरलाबेटास उर्वरित २१ लाख रूपयांची रक्कम धनादेशाद्वारे प्रदान करण्यांत आली. कोकमठाण पंचक्रोशीतील बिरोबा मंदिराच्या कामासाठी चार लाख रूपयांची मदत केली. कोपरगांव बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे, रामदासीबाबा भक्त मंडळ व अहमदनगर जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष शरद थोरात, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे, नामदेवराव परजणे गोदावरी खोरे दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले, शिवाजीराव वक्ते, संचालक बाळासाहेब वक्ते, सतिष आव्हाड, गोदावरी बायोरिफायनरीचे बी एम पालवे, रंगनाथ लोंढे, तुषार बारहाते, कमलाकर कोते, माजी मुख्याधिकारी हनुमंत भोंगळे, विजय रक्ताटे, वसंतराव लोंढे, शंकर चव्हाण, बाबासाहेब कोते, सुकदेव वाघ, दिलीप सदाफळ, रवि लोहकणे, संदिप पारख, वसंत थोरात यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. 

          महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, सप्ताहातुन नामस्मरण भजन, किर्तन, प्रवचनासह ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे सुरू असते. लेने को हरिनाम देने को अन्नदान यो बोधवाक्यातुन गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची सर्वांनाच प्रचिती आलेली आहे. सप्ताह काळात आलेल्या भाविकांची निवास व्यवस्था जंगली महाराज आश्रम आणि राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाने सांभाळुन मोठे सहकार्य केले.

सरलाबेट येथे महंत नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा १६ डिसेंबरला २०२२ रोजी असुन तीन दिवस यज्ञ याग आयोजित केला असुन त्यासाठी इच्छुक लक्ष्मी नारायण जोडप्यासाठी २१ हजार रूपये भरून सहभाग नोंदविता येणार आहे तरी या सर्व धार्मीक सोहळयाचा सर्वांनीच लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.