वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाचे आयोजन कौतुकास्पद – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : सामाजिक कार्याची आवड असणारी व्यक्ती नेहमीच सर्व सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असते. त्यामुळे ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी समाजाच्या उपयोगी पडायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या व्यक्ती आपली वाटचाल करीत असतात. हे समाजकार्य अविरतपणे पुढे सुरु ठेवतांना वाढदिवसाच्या दिवशी देखील मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबिराचे आयोजन करणे निश्चितपणे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष वाल्मीक लहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक व राजमुद्रा प्रतिष्ठाण कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबिरास आ. आशुतोष काळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल वाल्मिक लहिरे व राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या सर्व सदस्यांचे त्यांनी कौतुक करून भविष्यात देखील अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्व सामान्य नागरिकांना मदत करावी असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, बाळासाहेब रुईकर, आकाश डागा, संदीप देवळालीकर, अमोल देवकर, नितीन साबळे, शुभम भुजबळ, एकनाथ गंगुले, संतोष दळवी, संतोष बारसे, गणेश बोरुडे, मनोज नरोडे, विजय नागरे, देविदास कानडे, अमोल शिंदे, नितीन जाधव, अक्षय आंग्रे, अय्युब कच्छी, किरण कोपरे, सचिन कुडके, संदीप चौधरी, रवींद्र काळाने, रवींद्र वाघ, आकाश पवार, सुनील जंगम, तुकाराम चव्हाण, चेतन अहिरे, संतोष अहिरे, महेश लहिरे, सचिन जाधव, एकनाथ राक्षे, 

महेश जंगम, महेश चौधरी, मनोज कहार, आदिक इंदरके, अजय सणसे, उत्तम नळे, पवन मेहरे, अनिल चव्हाण, संतोष कापसे, सुरज बनसोडे, माधव घुगरकर, तेजस चव्हाण, मयूर चव्हाण, गणेश काळे, दुर्गेश कोपरे, सचिन कोपरे, बबलू कोपरे, कार्तिक थोरात, आदित्य पैलवान, राम गंगुले, बिरजू जाधव, राहुल तळेवट, अजय देसाई, स्वप्नील विसपुते, गणेश चौधरी, आकाश गायकवाड, महेश उगले, विशाल तुपे, सुरज तुपे, किरण लहिरे, अजय कचरे, आदिनाथ गायकवाड, सतीश राक्षे, रोहित परसैय्या, अक्षय मेहरे, रविराज आरोटे, सोनू इमले, कुणाल जगताप, सोनू दवंगे, विवेक काळे, बाळू काळे, योगेश घुगरकर, देविदास सोनवणे, जाकीर शेख, गोरख चोपदार, पप्पू बागवान, संदीप पंडोरे, विनोद लहिरे, अक्षय मेहेरे, बालाजी लकारे, विकी कुडके, लखन कुडके, अशोक बोरुडे, प्रदीप खाडे, दीपक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.