आर. जे. एस. नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक मधुमेह दिन साजरा

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : मधुमेह ही व्याधी आज सर्वांच्या परिचयाची झाली असून; या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष असे, ६० व्या वर्षांच्या सरासरी आयुर्मानात पडणाऱ्या या आजाराचा विळखा आता तिशितच नव्हे तर लहान मुलांत सुध्दा मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याने जनजागृती करणे गरजेचे आहे.याच मधूमेह दिनानिमित्त १४ नोहेंबर रोजी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेज व श्री जनार्दन स्वामी रुग्णालय यांच्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Mypage

सर्व प्रथम सकाळी १० वाजता साईबाबा चौफुली ते कोपरगाव ग्रामीण रुग्णालया पर्यंत नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पायी मधुमेह कसा होतो.झाल्यास काय करावे याच्या घोषणा देत जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीसाठी ग्लेनमार्क कंपनीने मदत केली.ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे मोफत सर्वरोग शिबिरात रुगांची तपासणी करण्यासाठी श्री जनार्दन स्वामी रुग्णालय येथील एम डी मेडीसीन सायली ठोंबरे,नेत्ररोग तज्ञ प्रशांत सगळगीळे, उपस्थित होते.

Mypage

यावेळी कोपरगाव रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप, यांनी विद्यार्थ्यांना मधुमेह दिनाचे मार्गदर्शन करत सर्व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या शिबिरात ४०० हून अधिक रुग्णांची तपासणी झाली असून निष्पन्न. झालेल्या रुग्णांना लगेच श्री जनार्दन स्वामी रुग्णालय येथे हलवून पुढील उपचार सुरू करण्यात आले आहे.हे शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री जनार्दन स्वामी रुग्णालयाचे जन संपर्क अधिकारी महेश रक्ताटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधक परिश्रम घेतले.

Mypage

या शिबिरा ठीकाणी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य इरशाद अली, ग्लेनमार्क कंपनीचे झोनल अधिकारी विजय अंतूर्कर, एस जे एस रुग्णालयाचे मेडिकल रेकॉर्ड विभागाचे कर्मचारी अमोल गायकवाड,नर्सिंग कॉलेजचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Mypage

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *