आमदार लंके लोकसभा निवडणुकीत उतरणार? – राहूल वरे

निलेश लंके यांचे उमेदवारीचे शेवगावात स्वागत

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० :  लोकनेते आमदार निलेश लंके यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेऊन लोकसभा निवडणुकीत उतरणार हे स्पष्ट केले. आमदार लंके यांच्या भूमिकेचे शेवगावात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

           या संदर्भात भावना व्यक्त करतांना येथील युवा नेते ग्रुपचे अध्यक्ष छबू मंडलिक व सामाजिक कार्यकर्ते राहूल वरे म्हणाले, ‘दोनच दिवसापूर्वी आ. लंके शेवगाव परिसरात आले होते. यावेळी परिसरातील सामान्य स्थरातील त्यांचा मोठा चाहता युवा वर्ग मोहळा सारखा जमा झाला होता. त्याचवेळी आ .लंके यांचा भावी खासदार म्हणून सत्कार करुन त्यांना खासदारकीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांना जास्तीत जास्त  मताधिक्यानी  निवडून आणू  फक्त आ. लंके यांनी स्वतः निवडणुक लढवावी अशी आग्रही भूमिका आम्ही मांडली होती.

आता त्यांनी आमदारकीचा त्याग करून महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तुतारी हाती घेतली आहे. तेव्हा आमच्या सामान्य कार्यकर्त्याची जबाबदारी वाढली आहे. आम्ही सर्व सामान्य मैत्रीला जागणारी मंडळी असून  त्यांच्या सोबत पुऱ्या ताकतीनिशी उभे राहू व शेवगाव-पाथर्डीतून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न करू, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

 यावेळी महाराष्ट्र राज्य म्हसन जोगी समाज उन्नती व विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पोषण्णा  किडमिंचे, राजूभाई शहा, रवी नवगिरे, संजू कडमिंचे, गोरख म्हस्के,  लक्ष्मण म्हस्के, मेजर पप्पू वाघमारे, संजू मोरे, आकाश म्हस्के, रोहिदास मस्के, बहादूर मंडलिक, विकास रोकडे, आकाश रोकडे, राहुल जगताप,  प्रकाश पैलवान,  बाळू भारस्कर, अमोल मोहिते, अरुण कडमिचे,  बाबू मामडे, अनिल मामडे, अंकुश कडमिंचे, अर्जुन भाऊ, सोनू वाघमारे, शरद कडमिंचे,  सलमान भाई पठाण यांचे सह अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.