शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : शेवगाव येथील रहिवासी सेवानिवृत्त महसूल अधिकारी प्रकाश अंबादास कुलकर्णी (वय ८५ ) यांचे शुक्रवारी पहाटे संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते गेले काही दिवस आजारी होते. जुन्या काळातील महसूल अधिकारी म्हणून त्यांची तालुक्यासह जिल्ह्यात ओळख होती.
कुलकर्णी हे पीए टोपण नावाने सर्वांना परिचित होते. शेवगाव तहसील कार्यालयात पुरवठा अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष कामकाज पाहिले त्यांच्या पश्चात दोन मुले एक विवाहित मुलगी चार बहिणी असा परिवार आहे. त्यांचे जेष्ठ चिरंजीव गौरंग हे लंडन येथे तर दुसरे चिरंजीव गौतम कॅनडा येथे कार्यरत असल्याने ते आल्यानंतर रविवारी शेवगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आली विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पीए कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.