अवैध वाळू डंपरवर शेवगाव पोलीसांची कारवाई

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : येथील दादेगाव रस्त्यावरून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर शेवगाव पोलीसांनी वाळू सह पकडून जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर यांनी अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात डंपर चालक व मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.   

Mypage

वाळूचा डंपर ( क्र. एम एच १३   ए एक्स २७०८) पोलिसांनी पकडला असता डंपर चालक दीपक संजय साळवे (वय-३० रा. आखतवाडे तालुका शेवगाव) याचे कडे वाळू वाहतुकीच्या परवाना बाबत  विचारणा केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. डंपर मध्ये एक ब्रास वाळू  आढळून आली. सुमारे सात  लाख रुपयाचा डंपर व दहा हजाराची एक ब्रास वाळू असा ७ लाख१० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

Mypage

ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली  पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, बप्पासाहेब धाकतोडे, सोमनाथ घुगे, रवींद्र शेळके यांनी केली. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल दराडे करीत आहेत. 

Mypage