शेवगाव तालुक्यात एकूण ४१.७३ टक्के मतदान

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : सोमवारी ( दि. ३० ) झालेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील ३ हजार २९१ पुरुष व८५२ महिला अशा एकूण ४ हजार १४३ मतदारापैकी १हजार ४८५ पुरुष व २४४ माहिला अशा एकूण १ हजार ७२९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात एकूण ४१.७३ टक्के मतदान झाले.

Mypage

    पदवीधर मतदारसंघाची निवडणूक म्हणजे सुशिक्षित, जाणकार मतदारांची निवडणूक मात्र यावेळी निवडणूक यंत्रणेच्या सावळ्या गोंधळामुळे अनेकांना मतदानासाठी मुकावे लागले. अनेकांनी नाव नोंदवून देखील त्यांची नावे मतदार यादीत आढळली नाहीत. त्यामुळे  अनेकांना मनस्ताप सोसावा लागला. ऑनलाईनवर शोध घेतांना अनेकांची नावे  तालुक्या व्यतिरिक्त दूसऱ्याच तालुक्याच्या मतदान केंद्रात आढळली. मतदान नोंदणीचा फॉर्म भरूनही ऑनलाईनवर अनेकांच्या नावापुढे ‘ रेकॉर्ड नॉट फाउंड ‘ असा शेरा पाहायला मिळाला. जितू शिवाजीराव देवढे यांनी एकाच वेळी दाखल केलेल्या १६ नाव नोंदणी अर्जापैकी दोघांची नावे शेवगावात तर १४ जणांची नावे नगर केंद्रात गेलेली आढळली.

Mypage

प्रा.विठ्ठलराव देवढे व प्रा.संगीता देवढे या प्राध्यापक पती- पत्नीची निवडणूक यंत्रणेने परस्पर फारकत केली. प्रा.देवढे यांचे नाव नगरला तर प्रा.सौ. देवढे यांचे नाव शेवगावच्या मतदार यादीत आढळले. ऐन वेळेस नगरला जाणे शक्य नसल्याने प्रा. देवढे यांना मतदानाला मुकावे लागले. दीपक रमेश पाथरकर, सचिन रमेश पाथरकर व शिल्पा दीपक पाथरकर या एकाच कुटुंबातील तिघांनी एकाच वेळेला मतदार नोंदणी अर्ज भरले.

Mypage

मात्र निवडणूक यंत्रणेने स्त्रीदक्षिण्य दाखवून शिल्पा पाथरकरचे नाव शेवगाव मतदार यादीत घेतले मात्र दीपक व सचिन यांना ‘नो व्हेअर ‘ केले; सारिका पाचारणे यांचे नाव कुठलाही सुतराम संबंध नसताना लोणीच्या ( ता. रहाता )मतदार यादीत गेल्याचे ऑनलाइन वरून समजले. तर प्रा. संजीवनी नवल या  नेवासे तालुक्यातील चांद्यावरून मतदानासाठी आल्या. त्यांची कुठेही नोंद सापडली नाही नसल्याने त्यांना देखील मतदानासाठी मुकावे लागले. असे कित्येकांच्या बाबतीत घडले आहे .

Mypage

      सोमवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात केवळ नाममात्र ५ .९१ टक्के मतदान झाले.  नंतर दहा ते बारा या वेळेत १४ .४३ टक्के  मतदानाची नोंद झाली. दुपारी बारा ते दोन या वेळेत मतदानाचा वेग काही प्रमाणात वाढला. शेवगाव शहरात दोन मतदान केंद्रे होती. शहरातील २१३१ मतदारांपैकी ८५८ मतदारांनी मतदान केले.  शहरात ४०.२६ टक्के मतदान झाले. अनेक मतदारांची नावे मिळून आली नसल्याच्या तक्रारी होत्या. अनेकांची नावे मतदार यादीत सापडली नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

Mypage

     माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले तसेच माजी सभापती डॉ.क्षितीज घुले यांनी तालुक्यातील भातकुडगाव येथील मतदान केंद्रावर मतदान केले. जनशक्तीचे अध्यक्ष एड. शिवाजी काकडे व माजी जि प सदस्य हर्षदा काकडे यांनी शेवगावच्या मतदान केंद्रावर मतदान केले. तालुक्यात केंद्रनिहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे : शेवगाव शहर ४०.२६टक्के, चापडगाव ४१.२८, समसूद एरंडगाव ३२.७४, ढोरजळगाव शे ४१.४२, बोधेगाव ४८.२४ तर भातकुडगाव ४३.८४ टक्के मतदान झाले. 

Mypage