प्रा. डॉ. कमलाकर गायकवाड यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १/९/२०२३ :
कोपरगाव येथील रिसर्च मार्गदर्शक व महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा जिल्हा नाशिक येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. कमलाकर गायकवाड सर यांना शैक्षणिक वर्ष २०२३ मध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय तसेच संशोधन कार्यात भरीव कामगिरी केल्यामुळे सोशिअल पॉईंट फाउंडेशन, इंदोर, मध्यप्रदेश यांचे वतीने  ‘राष्ट्रीय गौरव  पुरस्कार २०२३ (National Pride Award 2023) बहाल करण्यात आला.

सोशिअल पॉईंट फाउंडेशन, इंदोर, मध्यप्रदेश ही संस्था निती आयोग व एम.एस एम. ई. भारत सरकार यांचे द्वारे मान्यताप्राप्त नोंदणीकृत संस्था
आहे. अशा नामांकित संस्थेकडून पुरस्कार प्राप्त झाल्याने डॉ. कमलाकर गायकवाड यांचे महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक या संस्थेचे अध्यक्ष
मा.डॉ.प्रशांतदादा हिरे, उपाध्यक्ष मा.डॉ हरिष अडके, समन्वयक मा. डॉ.अपूर्वभाऊ हिरे, सचिव मा.डॉ. व्हि.एस मोरे मामा, मा.डॉ.बी.एस जगदाळे
सर, विश्वस्त व प्राचार्य, एल.व्हि.एच महाविद्यालय पंचवटी नाशिक मनापासून अभिनंदन केले.

तसेच बहुजन विकास समितीचे अध्यक्ष माजी पोलीस अधीक्षक के. पी. रोकडे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथील प्राचार्य डॉ.अरुण पाटील, उपप्राचार्य प्रा.व्हि. डी अहिरे, शैक्षणीक पर्यवेक्षक प्रा.एस एम.भोये व बहुजन विकास समितीचे सचिव पंडित भारूड सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. गायकवाड यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल डॉ.गायकवाड यांचे कुटुंबातील व समाजातील सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.