शेवगावात एड्स जनजागृती अभियान

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. १: येथील न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, रेड रिबन क्लब व राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आज एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले .

Mypage

     शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे  रॅलीतील मुलांमुलींनी बाजारपेठेतून   एड्स विषयी  जनजागृती केली . याप्रसंगी एड्स विषयी समाजामध्ये जनजागृती करण्याची शपथ  घेण्यात आली.

Mypage

      अभियानात ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे तसेच पांडुरंग मुलगे, सुजाता दहिफळे, प्राचार्य पुरुषोत्तम कुंदे, उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. संदीप मिरे, राष्ट्रीय छात्रसेना प्रमुख लेफ्ट. नारायण गोरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. उषा शेरखाने, प्रा. मिनाक्षी चक्रे आणि प्राध्यापक, छात्रसैनिक व स्वयंसेवक सहभागी होते.

Mypage