श्रीगणेश शाळेचा विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत तालुक्यात प्रथम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने  घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये श्रीगणेशाच्या विद्यार्थी अनुज डांगे याने २२० गुण मिळवून तालुका गुणवत्ता यादीत ११ वा क्रमांक पटकविला आहे. शैक्षणिक वर्ष २२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये श्रीगणेशच्या ५ वी वर्गातील एकूण ३० व ८ वी वर्गातील एकूण ९ विद्यार्थी पात्र ठरले होते, त्यापैकी एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय शेटे दिली.

यामध्ये इयत्ता ५ वी वर्गातील  शिवांजली डांगे, उत्कर्ष गोर्डे, सृष्टी पाटील, स्नेहल दाभाडे, सिद्धी वहाडणे, सुदर्शन भारस्कर, हर्षदा वाघे, स्वरा आंबेडकर, तेजल दिघे, मेघनाद पाचोरे, कृष्णा रोहम, ऋत्विका शिंदे, आर्यन कोल्हे, आर्यन कोल्हे, श्रेया डांगे, आरोशी डांगे, आराध्या थेटे, अदिती मुर्तडक, समीक्षा शिरोळे, अक्षदा मालुसरे, श्रद्धा भिंगारे, सोहम लांडगे, रुद्र गव्हाळे,

समीक्षा डांगे, वेदिका चौधरी, भूमिका गमे, चेतन थोरात, अवधूत जाधव, यश सुपेकर, सान्वी तारगे हे तसेच  ८ वी वर्गातील विवेक वाणी, श्रावणी जाधव, साई चव्हाण, प्रणव गोर्डे , ओम लांडगे, सतीश डांगे, भक्ती डांगे, वेदिका दरंदले, सुयश शेटे हे विद्यार्थी पात्र ठरले होते. गुणवत्ता यादी आलेल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

या विद्यार्थ्यांना आदिनाथ दहे, संतोष सुपेकर, आशा भालेराव, ज्योती गुजर, मंजुश्री गोर्डे, प्रवीण चाफेकर, कविता वहाडने, सरिता शिरोळे, मयुरी जगताप, आभाळे जयश्री, सविता वाबळे, पर्यवेक्षक दिपक गव्हाणे, प्राचार्य रामनाथ पाचोरे, प्राचार्य पंकज खडांगळे यांचे यशस्वी मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमीचंद लोढा, विश्वस्त कामिनी शेटे, भारत शेटे, रवींद्र चौधरी, सुरेश गमे, देविदास दळवी, महावीर शिंगवी, संदीप सोनिमिंडे, पंकज मुथा,योगेश मूनावत, स्वप्निल लोढा, चिराग पटेल, आकाश छाजेड, गणेश कुऱ्हाडे, निलेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.