दुसऱ्यांचे आयुष्य फुलविणे हाच काकडे शैक्षणिक समूहाचा उद्देश – ॲड. काकडे

शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ :  आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विदयालय व महाविदयालय यांच्या संयुक्त विदयमाने महाविदयालयातील माजी गुणवंत पवित्र पोर्टल मार्फत विविध जिल्हा परिषद व शासनाच्या विविध आस्थापनावर नियुक्ती मिळालेल्या विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला.

यावेळी काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख ॲड. शिवाजी काकडे म्हणाले, संस्थेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाविदयालय सुरू ठेवले, यातून एक दिवस निश्चितच विदयार्थ्यांच्या जीवनात आनंद फुलेल. या व्यापक उद्देशाने संस्थेने महाविदयालय चालविले. आज सर्व सार्थकी लागल्याचा अभिमान आहे.

व्यासपीठावर माजी जि. प. सदस्या हर्षदा काकडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, प्रा. लक्ष्मण बिटाळ, प्रा. सुनील आढाव, प्राचार्य सुधीर खिल्लारे, प्राचार्य अरुण चोथे होते. पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त झालेले दोन्ही महाविदयालयाचे एकूण ३२ विदयार्थी व  पालक प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.