शेवगावात डॉ.आंबेडकर जयंती निमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पैठण मार्गावरील बौद्ध विहार मध्ये शनिवार दि.२० एप्रिल ला महिलासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकात्मता मंचच्या वतीने आयोजित या महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरात महिलांची रक्तातील हेमोग्लोबीन व शुगर तपासणी तसेच
आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

त्यासाठी मंचचे कार्यकर्ते डॉ. निरज लांडे पाटील, डॉ. कृष्णा देहाडराय, जगदीश धूत, नवनाथ कवडे, गणेश भालेराव, संजू गंगावणे, हरिष शिदे, ज्ञानदेव वंजारी आदि प्रयत्नशील आहेत.