साडे पाचशे कोटी निधी मिळविल्याचे विरोधकांकडून अप्रत्यक्षपने स्वागत

Mypage

 प्रतिनिधी प्रतिनिधी, दि. १३ : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी जवळपास ५५२ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हि मतदार संघाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असून आ. आशुतोष काळे यांच्या धडपडीमुळे हे सर्व शक्य झाले आहे. याचे पारंपारिक विरोधकांकडून देखील अप्रत्यक्षपणे स्वागत करण्यात आले आहे.

Mypage

कोपरगाव तालुक्यातून राज्याच्या तिजोरीत हजारो कोटीचा महसूल जातो. त्या बदल्यात राज्य शासनाकडून मतदार संघाच्या विकासाला जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याच्या संधीचे सोने करीत आ. आशुतोष काळे यांनी मागील तीन वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जवळपास १२०० कोटी पेक्षा जास्त निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावले आहेत.

Mypage

मागील वर्षी राज्याच्या राजकारणात झालेल्या घडामोडीमुळे महाविकास आघाडी सरकार पायउतार होवून शिंदे फडणवीस सरकार आले. त्यामुळे आ. आशुतोष काळे विरोधी पक्षाचे आमदार झाले. मात्र विकासकामांना निधी मिळविण्याची त्यांची अपेक्षा अजूनही पूर्ण झालेली दिसत नसून त्यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मतदार संघासाठी तब्बल साडे पाचशे कोटीचा निधी मंजूर करण्यात यश मिळविले आहे. यामध्ये माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळावर सर्व सुविधायुक्त नवीन प्रवासी टर्मिनल उभारण्यासाठी ५२७ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Mypage

तसेच मतदार संघातील रस्त्यांसाठी २५.५० कोटी निधी दिला आहे. या निधीतून रा.मा.६५ अंजनापुर ते रांजणगाव देशमुख रस्ता (०५ कोटी), चास-वडगाव-बक्तरपुर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.०८) रा.मा. ६५ (कोपरगाव ते धारणगाव रस्ता) सुधारणा करणे (०४ कोटी), रा. मा.०७ धामोरी, येसगाव रस्ता (प्र.जि.मा.०४) येसगाव-खिर्डी गणेश-बोलकी रस्ता सुधारणा करणे (०४ कोटी), 

Mypage

बक्तरपुर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.०८) (मंजूर गाव ते बक्तरपुर रस्ता) सुधारणा करणे (२.५० कोटी), रा.मा. ७ रस्ता (प्रजिमा ८५) सा. क्र.०/५०० मध्ये कुंभारी येथील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाची दुरुस्ती करणे (०३ कोटी),उक्कडगाव रस्ता रा.मा.६५ (करंजी फाटा ते कॅनॉल पर्यंत रस्ता) मध्ये सुधारणा करणे (२.५० कोटी), रा.म.मा.५० (रा.मा.३६) शिंगवे ते बनकर वस्ती रस्ता सुधारणा करणे (२.५० कोटी), रामपूर वाडी ते पुणतांबा रस्ता (प्रजिमा ८७) मध्ये सुधारणा करणे (०२ कोटी) या रस्त्यांचा सामावेश आहे.

Mypage

यावरून एक सिद्ध होते की, मतदार संघाच्या विकासाची तळमळ असली की, सरकार कोणत्या पक्षाचे आहे हे महत्वाचे नसते तर मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न शासन दरबारी पोटतिडकीने मांडून जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे असते. त्यामुळे विरोधकांना सुद्धा तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे. कारण राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे आ. आशुतोष काळे यांच्या विकासाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळणारच नाही असा त्यांचा भ्रम होता.

Mypage

मात्र त्यांच्या मनातील भ्रमाचा भोपळा फुटल्यामुळे त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवत मतदार संघाला साडे पाचशे कोटी निधी दिल्याबद्दल राज्याच्या अर्थमंत्र्यांचे आभार मानले असून अप्रत्यक्षपणे आ. आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीचे स्वागतच केले आहे. हि जरी राजकारणाची एक बाजू झाली असली तरी विरोधी पक्षाचा आमदार असतांना देखील निधी मिळविता येवू शकतो याचा आदर्श आपल्या वडिलांकडून घेतलेल्या आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने विकासाची तळमळ असणारा आमदार मतदार संघाला लाभला आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *