कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : विश्वात्मक जंगली महाराष्ट्र आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक हॉस्पिटल व्यवस्थापन आणि डॉक्टरांच्या संगणकीय तंत्रज्ञानाच्या साह्याने आपल्या नेत्रांमध्ये आढळलेल्या कोणत्याही त्रुटींची विश्वासनीय तपासणी केली जाणार आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्थ नेत्रांची काळजी घेण्यात आणि आरोग्य पर जीवनशैली आत्मसात करण्यात मदत मिळणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात आत्मा मालिक हॉस्पिटलच्या मोफत नेत्र तपासणी टीमच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली आहे. ज्यामुळे राहता आणि कोपरगाव परिसरातील ग्रामीण भागातील लोकांची मासिक आठवड्यामध्ये नियमितपणे मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. नेत्र तपासणीसाठी आपल्याला कोणतेही शुल्क नसणार आहे. सोबतच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत येणाऱ्या आजारांवर देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
आपल्या गावात मोफत नेत्र तपासणी करून घेण्यासाठी आपल्या गावात आमचे वाहन आल्यावर सदर वाहन जवळ येऊन आपण न चुकता आपली नेत्र तपासणी करून घ्यावी. अशी विनंती हॉस्पिटल व्यवस्थापनाद्वारे करण्यात आलेली आहे आत्मा मलिक हॉस्पिटलच्या उपक्रमाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण खालील नंबर वर संपर्क साधावा. अक्षय कंड्रे( जनसंपर्क अधिकारी) 9156033221