कोळपेवाडी ग्रामपंचायत आठवडे बाजार लिलाव साडे अकरा लाखास

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत आठवडे बाजार वसुली लिलाव अकरा लाख सत्तावन हजारास जावुन मागिल वर्षि पेक्षा ग्रामपंचायतीस एक लाखाचे अधिक उत्पन्न मिळाले.

 कोळपेवाडी ग्रामपंचायत आठवडे बाजार एक वर्ष कालावधी असलेला वसुली लिलाव महेश्वर मंदिराच्या प्रांगणात नुकताच पार पडला. ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके यांनी लिलावाच्या अटी शर्ती चे वाचन केल्यानंतर सरकारी बोली पाच लाख ठेवुन त्या पुढे बोली बोलावी असे सांगिताच ग्रामंस्थ चांगलेच आक्रमक होवुन ग्रांमविकास अधिकार्याना धारेवर धरत प्रश्नांची शरबती केली.

सामाजिक कार्यकर्ते रवी कोळपे यांनी लिलाव वसुली हि पावती न देता मनमानी प्रमाणे व्यापाऱ्याकडुन वसुल केली जात असल्याचा खुलासा करत ग्रामपंचायत च्या कुठल्या पदाधिकार्यांनी बाजार च्या दिवशी नियमानुसार वसुली होते कि नाही याची चौकशी न केल्याने ठेकेदारी पध्दती बंद करुन ग्रामपंचायत कर्मचार्या मार्फत वसुली करण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला.

ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मणुष्य बळाची कमतरता दाखवत ईप्सित वसुली साध्य होणार नसल्याचे कारण पुढे केले. यावर ग्रामस्थांनी नियमाचे पालन होत असेल तरच लिलाव प्रक्रियेत भाग घ्यावा असे सांगितले. भाजी विक्रेते प्रा.जि. मा ८५ वरती बसत असल्याने रहदारीस अडथळा होत असल्याने वाहतूक काही काळ ठप्प होते. यापुढे रस्त्यावर बाजार भरल्यास ग्रामस्थांनी तक्रार केल्यास ठेकेदारास पाच हजार रुपये दंड करण्यात येईल.

विना पावती नियमबाह्य वसुली ठेकेदारांस करता येणार नाही. कर रचना फलक गावातील दर्शनी भागावर लावण्यात यावा ग्रामस्थांनी विक्रिस आनलेल्या शेतमालावर पावती आकारु नये. निवडणूक जत्रा कालावधी बंद वगळलेल्या बाजार ची वसुली न करणे अशा नियमाचे ठेकेदारास बंधन घालण्यात आल्यानंतर लिलाव अकरा लाख सत्यावन हजाराच्या सर्वोच्च बोली विलास कोळपे यांनी बोलत लिलाव घेतला संपूर्ण रक्कम ग्रामपंचायत ने ठेकेदारा कडुन एकरकमी वसुल करत असते.

बाजारासाठी आलेले व्यापारी खरेदीदार यांच्या सुरक्षितेसाठी सि. सि टिव्ही, पिण्याचे पाणी, शौचालय बाथरूम च्या गैर सोयी चा महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो कडे याकडे लक्ष वेधले.