अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या चिटणीस पदी सविता विधाते

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०२ : अडचणीच्या काळात कोपरगाव सारख्या तालुक्यात काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि काँग्रेस पक्षाचे विचार तालुक्यातील गावागावात पोहोचविण्याचे कार्य सविता विधाते यांनी केले. कोपरगाव काँग्रेस पक्षाच्या तालुका सरचिटणीस पदापासून त्यांनी कार्याला सुरुवात केली. या माध्यमातून महिलांचे प्रश्न प्रामुख्याने त्यांनी सोडविले.

Mypage

महिला मेळावे, आंदोलने, मोर्चा आदींच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळात पोहोचविला, महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व काँग्रेस पक्षाचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी सविता विधाते यांची अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या चिटणीस पदी निवड केली आहे.

tml> Mypage

त्यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापती वंदना मुरकुटे, कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे आकाश नागरे, तालुका सरचिटणीस रवींद्र साबळे आदींनी अभिनंदन केले.

Mypage